हॅमील्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिजला एक डाव आणि 134 धावांनी पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात 7 बाद 519 धावांवर आपला डाव घोषित केला. प्रतिउत्तरादाखल वेस्ट इंडिज संघाला पहिल्या डावात 138 आणि दुसर्या डावात 247 धावाच करता आल्या आणि त्यांना एका मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना 251 धावा केल्या. त्याला त्याच्या शानदार द्विशतकामुळे सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
वेस्ट इंडिजकडून जर्मन ब्लॅकवुडने ठोकले शतक
वेस्ट इंडिजने चौथ्या दिवशी(6 डिसेंबर) दुसऱ्या डावात 196/6 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरवात केली. यावेळी जर्मन ब्लॅकवुड आणि अल्झारी जोसेफ यांनी हळू हळू डावाला पुढे गेले. यादरम्यान ब्लॅकवुडने आपले शतक पूर्ण केले. परंतू तो या खेळीला मोठ्या खेळीत रुपांतरीत करू शकला नाही. त्याने 141 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 104 धावांची खेळी केली. त्याचबरोबर अल्झारी जोसेफने ही 86 धावांची खेळी साकारली.
या दोन खेळाडूने सातव्या विकेटसाठी 151धावांची भागीदारी केली. यांच्याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा कोणताच खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. त्याचबरोबर शेवटच्या तीन फलंदाजांना दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नाही. न्यूझीलंडकडून दुसर्या डावात नील वॅगनरनी 4 विकेट्सन घेत जबरदस्त कामगिरी केली.
या विजयासह न्यूझीलंड संघाने या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 या फरकाने आघाडी घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड – पहिला डाव 519/7 घोषित
वेस्ट इंडिज – पहिला डाव 138/10
वेस्ट इंडिज – दुसरा डाव 247/10
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियासाठी आनंदाची गोष्ट; अजिंक्य रहाणेची ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ संघाविरुद्ध शतकी खेळी
‘हा’ क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर टाकत आहे दबाव, दिग्गजाची प्रतिक्रिया
कर्णधार विराट कोहली ‘अशा’ टी20 मालिकेत कधीही झाला नाही पराभूत; ऑस्ट्रेलिया रोखणार का यशस्वी घोडदौड?
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस