ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज टी नटराजनने सर्वांना प्रभावित केले आहे. पहिल्याच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नटराजनने अनेक दिग्गजांची मने जिंकली आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात संजय मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गजांचाही समावेश आहे.
संजय मांजरेकर म्हणाले की ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सुरुवातीच्या दोन वनडेत अपयशी ठरलेल्या मोहम्मद शमीवर नटराजन दबाव टाकू शकतो. टी. नटराजनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीला सुरूवात करताना पहिल्याच सामन्यात 30 धावा देवून 3 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे समीक्षकांच्या, समालोचकांच्या आणि माजी समीक्षकांच्या नजरेत तो आला आहे.
मांजरेकर म्हणाले, ‘टी नटराजनने जे काम केले आहे त्यामुळे टी-20 प्रकारात मोहम्मद शमीवर दबाव टाकला आहे. आता संघ व्यवस्थापक सध्या तरी प्लेईंग इलेव्हन मध्ये सहभागी टी नटराजनला सहभागी करण्यासाठी उत्साही असणार आहे. हा गोलंदाज शेवटच्या षटकात गोलंदाजी करू शकतो. जर तुम्ही नटराजन आणि बुमराह यांना प्लेईंग इलेव्हन घ्यायचा विचार करत असाल तर शमीवर याचा दबाव येईल. कारण दीपक चाहर एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज आहे.
मांजरेकर म्हणाले, “नटराजनची कहाणी खूप जबरदस्त आहे राहिली आहे कारण तो एकदम तळातून या ठिकाणी पोहचला आहे आणि त्याने आपल्या पहिल्या टी-20 सामन्यात खूप चांगली कामगिरी केली.”
मांजरेकर म्हणाले, “मी त्याला एक चांगल्या गोलंदाजाच्या रुपात पाहतो. काही वर्षांपूर्वी कोणी त्याच्याबद्दल विचार सुद्धा केला नसेल. स्वतछ नटराजनने स्वप्नात सुद्धा हा विचार केला नसेल की भारतीय दिग्गज गोलंदाजांना तो आव्हान देईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार विराट कोहली ‘अशा’ टी20 मालिकेत कधीही झाला नाही पराभूत; ऑस्ट्रेलिया रोखणार का यशस्वी घोडदौड?
‘कन्कशन सब्स्टीट्युट’ म्हणून चहलला संधी दिल्याबद्दल अनिल कुंबळे म्हणाला…
दुसऱ्या टी२० सामन्यासाठी असे असू शकतात भारत-ऑस्ट्रेलिया ११ जणांचे संघ
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?