रविवारी(29 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघात टी-20 मालिकेतील दुसरा सामना बे ओव्हल येथे खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 238 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज संघाला 239 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला 9 बाद 166 धावाच करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडने 72 धावांनी विजय मिळवला. हा न्यूझीलंडचा टी20 मालिकेतील सगल दुसरा विजय असल्याने त्यांनी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात नाणेफेक गमावल्याने न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी केली. न्यझीलंडने सुरुवातीला 6.2 षटकात 53 धावावर 2 गडी बाद झाल्यानंतर कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी संघाची कमान सांभाळताना तिसर्या गड्यासाठी आक्रमक 184 धावांची भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंड संघाने 200 धावांचा टप्पा पार केला.
ग्लेन फिलिप्सनी 51 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर दमदार 108 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याचबरोबर कॉन्वेने ग्लेनला सुरेख साथ देताना 37 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 65 धावांची खेळी साकारताना संघाला 238 धावांचा डोंगर उभारून दिला.
239 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला सुरूवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी जखडून ठेवले. यामुळे वेस्ट संघाचे खेळाडू नियमित कालांतराने बाद होत गेले. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाकडून सर्वाधिक 28 ही धावसंख्या पोलार्डने उभारली. इतर कोणत्याच खेळाडूला धावपट्टीवर तग धरता आला नाही. वेस्ट इंडिजच्या चार खेळाडूंना साधी दुहेरी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला 20 षटकात 9 बाद 166 पर्यंतचं मजल मारता आली.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिज संघाच्या खेळाडूंची दाणादाण उडवली. काईल जेमिसन आणि मिशेल सॅन्टरन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले व इतर 4 गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यामुळे सलग दुसर्या सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंड संघाने 2-0 या फरकाने मालिकेत विजयी आघाडी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल
“रोहित शर्माने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये करावे भारतीय संघाचे नेतृत्व”