न्यूझीलंडमध्ये मर्यादित षटकांच्या 6 सामन्यांपैकी दोन सामनेे रद्द करावे लागले. टी20 मालिकेतील पहिला सामना आणि एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला. नेपियर येथे खेळल्या गेेलेल्या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला. आता क्रिकेटला इनडोर स्टेडीयमची गरज आहे, अशा चर्चांना उधान आले आहे, कारण न्यूझीलंड दौऱ्याच्या आधी टी20 विश्वचषकात देखील पावसाने वाईट अवस्था केली होती, तसेच बरेच सामनेे रद्द देखील करण्यात आले होते. रविवारी (27 नोव्हेंबर) खेळवण्यात येणारा एकदिवसीय सामना रद्द झाल्यावर न्यूझीलंड संघाच्या प्रशिक्षकांचे एक मोठेे वक्तव्य समोर आले आहे.
प्रशिक्षकांच्या मते, क्रिकेट छत असणाऱ्या स्टेडीयममध्येे खेळल्या जाण्याच्या पर्यायावर विचार करता येऊ शकतो. मात्र, हा मैदानी खेळ जेवढा शक्य आहे, तेवढा सुर्यप्रकाशात खेळला गेला पाहिजेे. न्यूझीलंडचा शेजारी देश असलेल्या ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकात चार सामनेे पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आले. त्याचबरोबर तीन सामन्यांचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला होता. या गोष्टीमुळे चर्चा सुरु झाल्या की इनडोर क्रिकेटची सुरुवात करायला हवी का? सतत पडणाऱ्या पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रद्द झाल्यावर 50वर्षीय स्टीड म्हणाले की, “न्यूझीलंडमध्ये इनडोर क्रिकेट स्टेडीयम उभारणे शक्य नाही, असे करण्यासाठी आमच्याकडेे मैदान नाहीत.”
जर सामन्यांचा निकाल असाच येत राहिला तर इनडोर स्टेडीयमचा विचार करावा लागेल
न्यूझीलंड दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेतील 6 सामन्यांपैकी 2 सामने रद्द करावे लागलेे, तर एका सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला. ते म्हणालेे की, “मला वाटते की, जर पर्याय उपलब्ध असेल, तर या गोष्टीवर विचार केला गेला पाहिजे. हे प्रत्येकाला वाटते की असे काहीतरी व्हायला पाहिजे. हा मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे आणि जेवढा शक्य आहे तेवढा सुर्यप्रकाशात खेळला गेला पाहिजे.”
सामना रद्द झाल्याने भारतीय संघ निराश
रविवारी भारत आणि न्यूझीलंड या संघात हॅमिल्टन येेथे खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. यादरम्यान पाऊस थांबवल्यावर पुन्हा सुरु झाला. मात्र, परत पाऊस सुरु झाल्याने सामना रद्द करण्यात आला. यामुळे भारतीय संघाची निराशा झाली आणि मोठ्या काळापासून न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. याचबरोबर भारतीय संघावर मालिका बरोबरीत सोडवण्याचा दबाव असणार आहे.(New Zealand’s Coach has given opinion about Indoor Cricket Stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या तर इरफानसारख्या, रैनाचा दिवस बनवला खास
सोनियाचा दिनु! पीटी उषा बनणार भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष