New Zealand vs Pakistan 5th T20I: क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात पाकिस्तानने यजमान न्यूझीलंडचा 42 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने निर्धारित 20 षटकांत 8 विकेट्स गमावून केवळ 134 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 17.2 षटकांत अवघ्या 92 धावांवर गारद झाला. मात्र, या पराभवानंतरही न्यूझीलंडने ही मालिका 4-1 अशी जिंकली आहे. इफ्तिखार अहमद याला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल सामनावीर म्हणून निवडण्यात आले आणि फिन ऍलन याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदी याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तानी संघाने युवा फलंदाज सॅम अयुबला खेळवले नाही आणि त्याच्या जागी हसीबुल्ला खानला पदार्पणाची संधी दिली पण तो खाते न उघडताच बाद झाला. यानंतर यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने 38 चेंडूत 38 धावा करत डावाची धुरा सांभाळली. बाबर आझमला केवळ 13 धावा करता आल्या. मधल्या फळीत फखर जमानने 16 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 33 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय साहिबजादा फरहानने 14 चेंडूत 19 धावा करत संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने ठराविक अंतराने आपल्या विकेट्स गमावल्या. एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. फिन ऍलनने 19 चेंडूत 22 धावा केल्या आणि ग्लेन फिलिप्सने 22 चेंडूत 26 धावा केल्या पण बाकीचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. यामुळेच संघ 92 धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून कर्णधार शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद नवाजने 2-2 विकेट्स घेतल्या. तर इफ्तिखार अहमदने अवघ्या 24 धावांत 3 विकेट्स घेतल्या. विश्वचषक 2023 नंतर कोणत्याही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे. (New Zealand’s heavy defeat by Pakistan in the 5th T20I their first win since the World Cup)
हेही वाचा
‘सानिया त्याच्या विवाहबाह्य…’, शोएब मलिकच्या बहिणीने भावाबाबत केला धक्कादायक खुलासा
Sania Mirza । शोएब मलिकने केलं तिसरं लग्न, दुसरी पत्नी सानिया मिर्झा म्हणाली….