---Advertisement---

इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत 160 धावांनी नमवून न्यूझीलंडचा ऐतिहासिक पराक्रम! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कामगिरी

On: सोमवार, जून 29, 2026 9:26 PM
NZ
---Advertisement---

नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा (NZ vs ENG) 160 धावांनी पराभव करून मालिका आपल्या नावावर केली. या विजयामुळे न्यूझीलंडने एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. या सामन्यात डेवोन कॉन्वे (Devon convey & Tom Lathom) आणि टॉम लॅथम यांनी पहिल्या डावात, तर डॅरिल मिचेलने दुसऱ्या डावात शतके झळकावली. या तिन्ही शतकांच्या जोरावर न्यूझीलंड संघ मोठी धावसंख्या उभारू शकला.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 438 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ त्यांच्या पहिल्या डावात 354 धावांत गारद झाला. त्यानंतर न्यूझीलंडने त्यांच्या दुसऱ्या डावात 9 बाद 288 धावांवर डाव घोषित केला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 373 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ अवघ्या 212 धावांत सर्वबाद झाला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर पुनरागमन करत मालिका जिंकली आहे. त्यामुळे कीवी संघासाठी हा विजय अत्यंत ऐतिहासिक ठरला. पहिल्या डावात न्यूझीलंडसाठी सलामीला उतरलेल्या टॉम लॅथम आणि डेवोन कॉन्वे यांनी शतकी खेळी केली. कॉन्वेने 22 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 157 धावा केल्या, तर लॅथमने 15 चौकारांच्या मदतीने 151 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात डॅरिल मिचेलने 10 चौकार आणि 1 षटकार मारून 100 धावा केल्या. या शानदार खेळीसाठी मिचेलला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला.

2015 पासून इंग्लंडने आपल्या घरच्या मैदानावर एकूण 23 कसोटी मालिका खेळल्या आहेत, ज्यापैकी 14 मध्ये त्यांना विजय मिळाला आहे, 7 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत, तर 2 मालिकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही वेळा इंग्लंडला न्यूझीलंडकडूनच पराभव पत्करावा लागला आहे. 2026 च्या या मालिकेआधी, 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही इंग्लंडचा न्यूझीलंडकडून 1-0 असा पराभव झाला होता. न्यूझीलंडचा संघ इंग्लंडच्या घरच्या मैदानावर सातत्याने वर्चस्व गाजवत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---