---Advertisement---

कडक सॅल्युट! काल ज्या भिंतीवरचा इतिहास वाचत होता, आज त्याच भिंतीवर त्याने स्वतःच नाव कोरलंय

---Advertisement---

कोणत्याही क्रिकेटपटूला प्रकाशझोतात आणण्यासाठी एखादी विशेष खेळी पुरेशी असते. फलंदाजांचे शतक किंवा त्याहून मोठी खेळी, क्षेत्ररक्षकाचा एखादा भन्नाट झेल आणि गोलंदाजाची एखाद्या डावातील शानदार अशी गोलंदाजी कामगिरी, त्याला एका रात्रीत क्रिकेटशौकिनांचा नायक बनवते. असेच काहीसे घडले आहे, न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू अजाज पटेल याच्यासोबत.

अजाजने भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात तब्बल १० विकेट्स घेतल्या आहेत. एकट्यानेच संपूर्ण भारतीय संघाची दाणादाण उडवत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले आहे. यानंतर आता त्याच्याबद्दल न्यूझीलंड संघाने केलेली एक पोस्ट, क्रिकेटरसिकांना खूप भावताना दिसत आहे. काय आहे पोस्टमध्ये?

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ४ विकेट्स घेणाऱ्या अजानने दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच एका षटकात २ विकेट्स काढल्या. डावातील ७२ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला बाद केल्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर त्याने अष्टपैलू आर अश्विनला आपल्या जाळ्यात फसवले. यासह त्याने भारताला ६ बाद २२४ धावा अशा स्थितीत आणले होते.

यासह तो भारतातील कोणत्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकीपटू बनला. त्याच्या या विलक्षण कामगिरीसह त्याने वानखेडेच्या ऑनर्स बोर्डवर आपले नाव कोरले होते. कसोटी सामन्याच्या एका डावात ५ पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची या बोर्डावर नावे लिहिली जातात. न्यूझीलंडने याचसंबंधी एक पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये दिसते की, अजाज पहिल्या दिवशीच्या सामन्यानंतर वानखेडेवरील त्या भितींवरच्या बोर्डावरील ऐतिहासिक यादी बघत आहे. न्यूझीलंडने हे फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, ‘काल तो त्या भिंतीवरील इतिहास पाहात होता, आज त्याने याच भितींवर आपले नाव कोरले आहे.’ हीच पोस्ट सध्या क्रिकेटरसिंकामध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

न्यूझीलंडने ही पोस्ट टाकतेवेळी अजाजने केवळ ६ च विकेट्स घेतल्या होत्या. परंतु पुढे आपल्या या कामगिरीत अजून ४ विकेट्सची भर पाडत त्याने १० विकेट्स घेण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. त्यामुळे या पोस्टकडे चाहत्यांचे अजून जास्तच लक्ष वेधले गेले आहे. अगदी अजाजने ज्या भारतीय संघाविरुद्ध ही विक्रमी कामगिरी केली, त्याच भारतीय देशांचे रहिवासीही त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

याचि देही याचि डोळा! द्रविड-श्रीनाथने तिसऱ्यांदा अनुभवला ‘परफेक्ट टेन’चा थरार

शानदार… जबरदस्त…! एजाज पटेलने घेतल्या भारताच्या १० विकेट्; कुंबळे, लेकरच्या यादीत सामील

माजी विक्रमवीराची आजी विक्रमवीरावर कौतुकाची ‘जम्बो’ थाप! ‘तुझं स्वागत आहे या क्लबमध्ये’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---