---Advertisement---

जिगरबाज! पितृशोक बाजूला ठेवत खेळाडू खेळतोय सामना; विलियम्सनने मिठी मारत केले सांत्वन

On: गुरूवार, डिसेंबर 3, 2020 4:32 PM
---Advertisement---

हॅमिल्टन येथील मैदानावर गुरुवारपासून (३ डिसेंबर) न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघांमधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर अतिशय हळवे दृश्य पाहायला मिळाले. सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोचच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी आली. मात्र, रोचने हिंमत एकवटत हे दुःख बाजूला सारत सामना खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या हिमतीचा सन्मान करत सगळ्याच खेळाडूंनी त्याला प्रोत्साहन देत त्याचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने देखील रोचला मिठी मारत त्याला धीर दिला.

डोळे पाणावणारा क्षण

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन मैदानासह मैदानाबाहेरही सभ्य गृहस्थ म्हणून ओळखला जातो. त्याच्यातील संवेदनशीलतेचे आणि माणुसकीचे दर्शन क्रिकेट चाहत्यांना अनेकदा झाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वीही विलियम्सनने याचाच प्रत्यय दिला.

पितृशोकातून सावरणाऱ्या केमार रोचला मिठी मारत विलियम्सनने त्याचे सांत्वन केले. त्याच्या या संवेदनशील कृतीने अनेकांचे डोळे पाणावले असतील. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोन्ही संघांनी वाहिली श्रद्धांजली

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संघ केमार रोचच्या वडिलांना श्रद्धांजली म्हणून या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी काळी फीत बांधून खेळतील. केमार रोच आणि त्याच्या कुटुंबाच्या या अवघड परिस्थितीत त्यांच्या सोबत असल्याचे सांगत वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने रोचला धीर दिला आहे.

टॉम लॅथमला केले बाद

हॅमिल्टन येथील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात गोलंदाजी करताना केमार रोचने एक बळी मिळविला. न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमचा ८६ धावांवर त्याने त्रिफळा उडवला. हा बळी मिळाल्यानंतर त्याने गुडघ्यावर बसून आभाळाकडे बघत आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
न्यूझीलंडच्या संघाने दिवसाचा खेळ संपला, तेव्हा २ बाद २४३ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे ‘संपूर्ण वेळापत्रक’; पाहा कधी आणि कुठे होणार सामने

भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यात मैदान गच्च भरणार, सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा

ट्रेंडिंग लेख-

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर

भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर

‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्‍या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---