क्रिकटमध्ये अनेक विक्रम झाल्याचे आणि मोडल्याचेही आपण अनेकदा पाहतो. अनेक विक्रम असे आहेत जे तयार होऊन कित्येक दिवस झाले तरी कोणालाही तोडता येत नाहित. मात्र, या सर्व गोष्टीत महिला क्रिकेटमधील एक विक्रम असा आहे जो तयार होऊन आज ४ वर्ष झाले आहेत मात्र आजवर महिला काय पुरुष क्रिकेटसंघांपीकी सुद्धा कोणीही हा विक्रम मोडू शकलेले नाही.
८ जून २०१८ रोजी न्यूझीलंडचा महिला संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर होता. दोन्ही संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांत न्यूझीलंड संघाने हा विक्रम रचला. न्यूझीलंडची कर्णधार सूजी बेट्सने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने ५० षटकांत तब्बल ४९१ धावा केल्या. न्यूझीलंडने बनवलेल्या ४९१ धावांमध्ये कर्णधार सूजी बेट्स हिच्या ९१ चेंडूत १५१ धावांचा आणि मैडी ग्रीन हिच्या ७७ चेंडूत १२२ धावांचा समावेश होता.
या डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजी करायला आलेल्या आयरलैंडच्या संघाला ४५.३ षटकांत केवळ १४४ धावा करत संपूर्ण संघ बाद झाला. या सामन्यांत न्यूझीलंड संघाने आयर्लंडच्या संघावर तब्बल ३४७ धावांनी मात केली. न्यूझीलंड संघाला मिळालेला हा विजय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात मोठ्या फरकाचा विजय आहे.
दरम्यान, न्यूझीलंड नंतर महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांत सरावाधिक धावा करणाऱ्या संघांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ विराजमान आहे. ऑस्ट्रेलियने एका एकदिवसीय सामन्यांत ४१२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघा व्यतिरिक्त कोणत्याही संघाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४०० धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. शिवाय न्यूझीलंडने मिळवलेल्या विजयाच्या अंतराच्या जवळपास देखील अजूनपर्यंत कोणताही संघ पोहचू शकलेला नाही.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हसावं की रडावं! फिल्डर्सनी एकाच वेळी गमावली तीनदा रनआऊट करण्याची संधी, Video एकदा पाहाच
देवानंतर सचिनमुळेच झालो मी स्टार; रावळपिंडी एक्सप्रेसची कबुली
दीडशेहून अधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजावरील बॅन हटला, ‘या’ कारणामुळे आणली होती बंदी