न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा ३ विकेट राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम खेळताना आयर्लंडने ४८ षटकांत २१६ धावा केल्या आणि संघ बाद झाला. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडने ३९व्या षटकात ७ बाद २१९ धावा करून सामना जिंकला. यावेळी न्यूझीलंड संघ फलंदाजीला आला तेव्हा त्यांनी सामन्याच्या पहिल्या २ चेडूंवर २ गडी गमावले. त्यानंतर सामन्यात विजय मिळवून एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. डावाच्या पहिल्या २ चेंडूंवर २ गडी गमावल्यानंतरही सामना जिंकणारा न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील पहिला संघ बनला आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. आयरिश सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बालबर्नी अनुक्रमे ० आणि २ च्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाले. हॅरी टेक्टरलाही विशेष काही करण्यात यश आले नाही आणि त्याला ४ धावा करता आल्या. दरम्यान, अँडी मॅकब्राईनने २८ आणि कर्टिस कॅम्फरने २५ धावा केल्या. विकेट्सही सातत्याने पडत होत्या. डॉकरेलने फलंदाजी करताना आयरिश डावाचा ताबा घेतला. तो ६१ चेंडूत ७४ धावा करून बाद झाला. त्याच्याशिवाय मार्क एडेअरने नाबाद २७ धावा केल्या. अशाप्रकारे आयर्लंडचा संघ २१६ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडकडून ब्रेसवेल, सँटनर आणि हेन्री यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करताना २-२ बळी घेतले.
प्रत्युत्तरात खेळणाऱ्या किवी संघाचीही सुरुवात खराब झाली. मार्टिन गप्टिल आणि विल यंग खाते न उघडता बाद झाले. त्यांच्यानंतर फिन ऍलन आणि टॉम लॅथम यांनी फलंदाजी करत धावसंख्या १०० च्या पुढे नेली. ऍलन ६० धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर हेन्री निकोल्सनेही १७ धावा केल्या. फिलिप १६ आणि लॅथम ५५ धावांवर बाद झाल्याने किवीज अडचणीत आले होते, पण मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या ब्रेसवेलने यावेळीही दमदार फलंदाजी करत नाबाद ४२ धावा केल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडने ७ विकेट्सवर २१९ धावा करून सामना जिंकला. आयर्लंडकडून मार्क अडायर आणि सिमी सिंगने २-२ बळी घेतले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाद नाय गड्या! एकदिवसीय मालिकेत धावा करण्याच्या यादीत विल्यमसन आणि पाँटिंगला मागे सारत रोहितच नंबर १
‘विराट दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात करणार पुनरागमन?’ पहिल्या मॅचमध्ये मिळालेत महत्तवाचे संकेत
इंग्लंडचा धुव्वा उडवत रोहित-शिखरने गाठलं आकाश, सचिन-गांगुलीच्या विश्वविक्रमापासून फक्त एक पाऊल दूर