भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जात आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सर्कलमध्ये खेळल्या जात असलेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटीत बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला फलंदाजीची संधी दिली.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खुपच खराब झाली. संघाच्या केवळ 14 धावांवर कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. वैयक्तिक 6 धावांवर हिटमॅन हसनचा बळी ठरला. यानंतर फलंदाजीला आलेल्या शुबमन गिलला खातेही उघडता आले नाही आणि तो हसनचा दुसरा बळी ठरला. त्याने 7 चेंडू खेळून शून्यवर बाद झाला. 28 धावांवर गिलची विकेट पडली. तर चाैथ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहली देखील स्वस्तात बाद झाला. कोहली 6 चेंडू खेळून 6 धावा करुन तंबूत परतला. आशाप्रकारे टीम इंडियाची टाॅप ऑर्डर युनीट पूर्णपणे फ्लाॅप ठरले आहे.
शुबमन गिल आणि रोहित शर्मा दोघेही सुरुवातीपासूनच हसन महमूद विरुद्ध फलंदाजी करताना झगडताना पाहायला मिळाले. आक्रमक गोलंदाजी करत हसन महमूदने या बातमी आखेरीस 5 षटके टाकून 3 विकेट्स घेतल्या. तसेच भारतीय संघ या बातमीपर्यंत 40-3 अश्या परिस्थितीत आहे. सध्या यशस्वी जयस्वाल (19) तर रिषभ पंत (3) सध्या खेळपट्टीवर आहेत.
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज
बांग्लादेशचा संघ- शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो(कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास(यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा
हेही वाचा-
पहिल्या कसोटीत आरसीबीच्या गोलंदाजाला संधी; दुलीप ट्रॉफीत केला होता कहर
कॅरेबियन पाॅवर! स्टार खेळाडूचे 124 मीटरचे उत्तुंग षटकार; गोलंदाजाचे बत्या गुल..
ind vs ban: बांग्लादेशचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; पाहा प्लेइंग इलेव्हन