विजय परेडनंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात विराट कोहलीने खास भाषण केले. बार्बाडोसमध्ये चॅम्पियन बनल्यानंतर तो आणि रोहित शर्मा किती भावूक झाला हे त्याने सांगितले. विजयानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. विराटने सांगितले की, 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने रोहितला इतका भावूक कधीच पाहिला नाही. तर मग जाणून घेऊया की कोहलीने विजयानंतरच्या क्षणाचे वर्णन कसे केले.
सत्कार समारंभात किंग कोहली म्हणाला, “15 वर्षात पहिल्यांदाच मी रोहित शर्माला इतका भावूक होताना पाहिला. मी पायऱ्या चढत असताना तो रडत होता आणि मीही रडत होतो. त्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली. आमच्यासाठी ही खूप खास आठवण असेल, मला वाटते की आम्ही जबाबदारी स्वीकारली आणि ट्रॉफी परत आणण्यापेक्षा दुसरे काहीही नाही.”
2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरसह संघातील वरिष्ठ खेळाडू का रडत होते हे मला समजत नव्हते, असे कोहली म्हणाला. किंग कोहली म्हणाला की, आता तो स्वत: संघाचा सीनियर खेळाडू आहे, तेव्हा त्याला याची जाणीव झाली. विजय परेडनंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला बीसीसीआयकडून 125 कोटी रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
उल्लेखनीय म्हणजे की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 2024 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. किंग कोहलीने अंतिम सामन्यानंतर लगेचच निवृत्ती जाहीर केली होती. दुसरीकडे, सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली होती. निवृत्ती घेताना या दोन्ही खेळाडूंनी निरोप घेण्याची यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही, असे म्हटले होते.
महत्तवाच्या बातम्या-
रोहित-विराटच्या टी20 निवृत्ती बाबत सुरेश रैना खूपच भावूक, चक्क बीसीसीआयकडे केली विशेष मागणी
रोहितनं भर मैदानात असं काही सांगितलं, त्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये हार्दिकचं नाव दुमदुमलं
घरी देखील हिटमॅनचं जंगी स्वागत, या पध्दतीनं होती खास व्यवस्था