---Advertisement---

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! टीम इंडियाचे आगामी हंगामाचे वेळापत्रक जाहीर

On: गुरूवार, एप्रिल 3, 2025 8:08 AM
---Advertisement---

बीसीसीआयने बुधवारी (2 एप्रिल) 2025 साठी भारतीय संघाचे घरच्या मैदानावरील वेळापत्रक जाहीर केले. भारत ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या हंगामाची सुरुवात करेल. जिथे दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका होईल. यानंतर, नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येईल. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळले जातील.

भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबरपासून खेळला जाईल. तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल. यानंतर, दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होईल. एकदिवसीय मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल. तर टी-20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होईल. भारताचा घरचा हंगाम 19 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्याने संपेल.

भारतीय संघाचे 2025 च्या घरच्या मैदानाचे वेळापत्रक
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वेळापत्रक
पहिली कसोटी- 02-06 ऑक्टोबर, अहमदाबाद
दुसरी कसोटी – 10-14 ऑक्टोबर, कोलकाता

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाचे वेळापत्रक 2025
पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर,दिल्ली
दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर, गुवाहाटी

पहिला वनडे- 30 नोव्हेंबर, रांची
दुसरा वनडे- 3 डिसेंबर, रायपूर
तिसरा वनडे- 6 डिसेंबर, विशाखापट्टणम

पहिली टी20 – 9 डिसेंबर, कटक
दुसरी टी20 – 11 डिसेंबर, चंदीगड
तिसरी टी20 – 14 डिसेंबर, धर्मशाळा
चौथी टी20 – 17 डिसेंबर, लखनऊ
पाचवी टी20 – 19 डिसेंबर, अहमदाबाद

घरच्या हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला जाईल. दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ज्याची सुरूवात 20 जूनपासून होईल, तर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलै रोजी खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---