---Advertisement---

CSK vs MI: ‘हा’ ठरला चेन्नईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट

On: सोमवार, मार्च 24, 2025 7:02 AM
---Advertisement---

काल (23 मार्च) चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात सामना खेळला गेला ज्यामध्ये सीएसकेने मुंबई इंडियन्सला 4 विकेट्सने हरवले. चेन्नईच्या या विजयात नुर अहमदची गोलंदाजी निर्णायक ठरली.

चेन्नईकडून पहिल्याच सामन्यात खेळताना नूर अहमदने विक्रमी कामगिरी केली. त्याने 4 षटकात 18 धावा देत 4 बळी घेतल्या. ज्यात त्याने रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि राॅबिन मिन्झ यांना बाद केले. त्याच्या या कामगिरीने त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास पहिल्या डावात खेळणार्या मुंबई इंडियन्सला चेन्नईच्या गोलंदाजांनी 155 धावांवर रोखले, चेन्नई सुंपर्ण सामन्यात नियंत्रित कामगिरी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेने ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सामना 19.1 षटकांत जिंकला, यासह सीएसकेने हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---