आयपीएल 2025 मध्ये आठव्या सामन्यात काल (28 मार्च) आरसीबी आणि सीएसके आमने सामने होते. हा सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला जो की सीएसकेने 50 धावांनी गमावला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबाने चेन्नई समोर 197 धावांचे बलाढ्य लक्ष्य ठेवले, प्रत्युत्तरात सीएसकेला केवळ 146 धावा करता आल्या.
टाॅस जिंकून चेन्नईने आरसीबीला प्रथम फलंदाजीचे आमत्रंण दिले. पहिल्या डावात खेळताना बेंगळुरुने 20 षटकात 196 धावा केल्या. ज्यामुळे कर्णधार रजत पाटीदारने आक्रमक अर्धशतकी खेळी खेळली. त्याने 32 चेंडूत 51 धावा केल्या. ज्यात 4 चाैकार व 3 षटकारांचा समावेश होता. मधील फळीत आलेल्या या तडाखेबंद खेळीच्या जोरावर संघ मजबूत धावसंख्येकडे मार्गस्थ झाला. अंतिम षटकात टिम डेव्हिडच्या 22 धावांच्या खेळीने संघ 196 धावांपर्यंत पोहोचला. शिवाय विराट कोहली 31 तर फिल साॅल्टने 32 धावा केल्या.
5️⃣0️⃣ up for RCB's Gen BOLD skipper! 👏#RajatPatidar led the fight from the front, scoring his first half-century as RCB captain! 🙌👌🫡#IPLonJioStar 👉 CSK 🆚 RCB | LIVE NOW on SS-1, SS-1 Hindi, SS-3 & JioHotstar! pic.twitter.com/pm3kMAYyrk
— Star Sports (@StarSportsIndia) March 28, 2025
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब सुरुवात झाली. संघाने दुसऱ्या षटकात 2 विकेट्स गमावल्या, जोश हेझलवूडने राहुल त्रिपाठी (5) व ऋतुराज गायकवाडला (0) बाद केले. या ठिकाणीच संघ खचला व पुन्हा कमबॅक करु शकले नाही. परिणामी संघाला पराभावाला सामोरे जावे लागले. शेवटी 20 षटकांत चेन्नईला 146 धावांपर्यंत पोहोचता आले. आशाप्रकारे आरसीबीने 50 धावांनी सामना जिंकला.