---Advertisement---

CSK vs RCB: हा ठरला बंगळुरूच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

---Advertisement---

आयपीएलच्या 18व्या हंगामातील आठवा सामना काल (28 मार्च) आरसीबी विरुद्ध चेन्नई यांच्यात खेळला गेला. हा सामना चेन्नईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच एम ए चिंदमबरम येथे रंगला, या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा 50 धावांनी पराभव केला, अखेर 17 वर्षांनी बेंगळुरुने चेन्नईचा किल्ला भेदला. आरसीबीने 2008 मध्ये या ठिकाणी शेवटचा सामना जिंकला होता.

टाॅस गमावल्यानंतर पहिल्या डावात खेळताना आरसीबीने 20 षटकात 7 गडी गमावून196 धावा ठोकल्या, ज्यात कर्णधार रजत पाटीदारने 51 तर फिल साॅल्ट 32 आणि विराट कोहलीने 31 धावा केल्या. शेवटी टीम डेव्हिडने 8 चेंडूत 22 धावा करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब सुरुवात झाली. संघाने दुसऱ्या षटकात 2 विकेट्स गमावल्या, जोश हेझलवूडने राहुल त्रिपाठी (5) व ऋतुराज गायकवाडला (0) बाद केले. या ठिकाणीच संघ खचला यानंतर 5व्या षटकात भुवनेश्वर कुमारने दीपक हुडाला 4 धावांवर बाद केले. आशाप्रकारे सीएसकेने पाॅवरप्लेमध्ये 3 विकेट गमावल्या ज्यातून संघ सावरु शकला नाही. परिणामी संघाला पराभावाला सामोरे जावे लागले. शेवटी 20 षटकांत चेन्नईला 146 धावांपर्यंत पोहोचता आले. आशाप्रकारे आरसीबीने 50 धावांनी सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---