---Advertisement---

फिरकीच्या फासात अडकली चेन्नई, हा खेळाडू ठरला मॅचविनर

On: सोमवार, मार्च 31, 2025 7:12 AM
---Advertisement---

आयपीएल 2025चा अकरावा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर खेळवण्यात आला. राजस्थानने हा सामना 6 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नई सुपर किंग्ज संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 176 धावा करू शकला. या हंगामात सीएसकेचा हा सलग दुसरा पराभव आहे.

182 धावांचा बचाव करताना राजस्थानच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. वानिंदू हसरंगाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या त्याने 4 षटकात 35 धावा देत चेन्नईच्या 4 फलंदाजांना तंबूत पाठवले. मधल्या फळीत त्याने कसून गोलंदाजी केली, चेन्नईला मधल्याळीत मोठे फटकार मारण्यास रोखले. त्याने ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, विजय शंकर आणि शिवम दुबे यांना बाद केले. त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान राॅयल्सने सामना जिंकला. त्याच्याशिवाय जोफ्रा आर्चर व संदिप शर्मा यांनी 1-1 गडी बाद केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---