भारत ही क्रिकेट प्रतिभेची खाण आहे. जेथे अनेक खेळाडू येतात आणि त्यांचे नशीब काही क्षणातच बदलते. पण काही खेळाडूंवर नशिबाचा दुर्देव आहे की त्यांच्या टॅलेंटचा काही उपयोग होत नाही. टीम इंडियाचा असाच एक माजी क्रिकेटर म्हणजे ज्ञानेंद्र पांडे ज्यांच्याबद्दल असे रहस्य उघड झाले की सगळेच थक्क झाले. हा असा क्रिकेटपटू आहे जो भारतीय दिग्गज सौरव गांगुली आणि राहुल द्रविड सारख्या खेळाडूंसोबत खेळला आहे.
ज्ञानेंद्र पांडेने 1999 मध्ये पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियासाठी डेब्यू केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. परंतु त्याचे करिअर केवळ आठवड्याभरात संपले. त्याने अष्टपैलू कामगिरी केली. खरं तर केवळ 2 सामन्यात ते काही खास कामगिरी करु शकले नाही. न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत त्यांनी संघात आपली जागा बनवली होती. परंतु त्यांनतर त्यांच्यकडे कान डोळा करण्यात आले. आता 24 वर्षांनी ज्ञानेंद्र पांडेंनी गुपित उघड केले आहे.
क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर ज्ञानेंद्र पांडे एसबीआयमध्ये पीआर एजंट म्हणून काम करतात. विशेष म्हणजे तो कार किंवा कोणत्याही मोठ्या वाहनासाठी ड्रायव्हर ठेवत नाही तर तो त्याच्या स्कूटरसाठी ड्रायव्हर ठेवतो. लल्लनटॉपवर बोलताना तो म्हणाला, ‘हो मी ड्रायव्हर ठेवले आहे. पण तो माझा जवळचा मित्र आहे. सचिन तेंडुलकरजींनी मला एकदा असे विचारले होते. मी स्कूटर का चालवत नाही. तेव्हा तो म्हणाला ड्रायव्हिंग शिकण्याची इच्छा कधीच नव्हती.
तत्तपूर्वी पांडेने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये विशेषत: रणजी ट्रॉफीमध्ये आपली छाप पाडली. जिथे त्यांनी उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 97 रणजी सामने खेळले आहेत.ज्यामध्ये 4,425 धावा केल्या आणि 148 बळी घेतले. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या अष्टपैलू कामगिरीने ते राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
हेही वाचा-
सचिनला घडवणाऱ्या आचरेकर सरांंचं मुंबईत स्मारक बनणार! राज्य सरकारचा निर्णय
लखनऊ रोहित शर्माला 50 कोटींमध्ये खरेदी करणार? मेगा लिलावापूर्वी मोठी अपडेट
भारताचे मोठमोठे फलंदाज या युवा फिरकीपटूसमोर गंडले! टीम इंडियात संधी मिळणार का?