---Advertisement---

GT vs PBKS: शुबमन गिल नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर, आज घडणार मोठा पराक्रम?

Shubman-Gill-Record
---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना आज 25 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. आयपीएल 2025 मध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल. अशा परिस्थितीत गुजरात आणि पंजाब विजयाने त्यांच्या मोहिमेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यात श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांच्यात कर्णधारपदासाठी चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. अय्यरने गेल्या वर्षी केकेआरला चॅम्पियन बनवले आहे, तर शुबमन गिल या हंगामात त्याच्या संघाला जेतेपद मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अय्यर आणि गिल दोघेही आक्रमक फलंदाज आहेत, त्यामुळे आजच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे आयपीएलमध्ये शुबमन गिलच्या संघाचे होम ग्राउंड आहे, त्यामुळे पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करून घरच्या चाहत्यांना विजयाची भेट देण्याचे गुजरातचे उद्दिष्ट असेल. तसेच, कर्णधार शुबमन गिल देखील नवीन इतिहास रचण्याकडे लक्ष ठेवेल. खरंतर, गिल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. पंजाबविरुद्ध तो 47 धावा करताच, नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1000 आयपीएल धावा करणारा खेळाडू बनेल. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज असेल. अहमदाबादमध्ये आतापर्यंत कोणताही खेळाडू हा आकडा गाठू शकलेला नाही.

शुबमन गिलने नरेंद्र मोदी स्टेडियमवर 18 आयपीएल सामने खेळले आहेत. ज्यात 63.53 च्या सरासरीने 953 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 159.36 आहे. या ठिकाणी त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. जीटीच्या होम ग्राउंडवर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गिलच्या जवळपासही कोणीही नाही.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

शुभमन गिल – 953
साई सुदर्शन – 603
अजिंक्य रहाणे – 336
डेव्हिड मिलर – 308
वृद्धिमान साहा – 290
हार्दिक पांड्या – 235

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 103 सामन्यांच्या 100 डावात 4 शतके आणि 20 अर्धशतकांसह 3216 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 37.83 आहे आणि स्ट्राईक रेट 135.69 आहे. गुजरातपूर्वी, गिल 2018 ते 2021 पर्यंत केकेआर संघाचा भाग होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---