रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी20 विश्वचषकासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आपला सराव सामना खेळला, ज्यामध्ये भारताने 60 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या डोक्यात चालायं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण रोहित शर्माच्या सामन्यातील दोन निर्णयांमुळे चाहत्यांच्या मनात संभम्र निर्माण झाले आहे.
रोहित शर्माने संजू सॅमसनला सलामीला मैदानात उतरवून सर्वांना आश्चर्यचकित केले. सराव सामन्यात रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल सलामी करताना दिसेल, असे सर्वांना वाटत होते पण यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने त्याच्यासोबत सलामीची जबाबदारी घेतली. पण रोहितचा हा निर्णय चुकला असे म्हणता येईल कारण संजूने मात्र 1 धाव करुन तंबूत परतला.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात एकूण 8 भारतीय गोलंदाजांनी गोलंदाजी केली, ज्यात अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश होता. पण गोलंदाजांच्या यादीत स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलचे नाव नव्हते. त्यामुळे चाहत्यांना मोठे कुतूहुल निर्माण झाले आहे.
चहलला गोलंदाजी का दिली नाही? हे फक्त रोहित शर्माच जाणू शकतो. पण कदाचित रोहितला विश्वचषकापूर्वी चहलची रणनीती उघड करायची नसेल, तर सालामीसाठी काय फरक होणार? हे देखील पहावं लागेल. अशा परिस्थितीत मात्र सोशल मीडिया मध्ये मात्र रोहित विराट सलामी करणार याची चर्चा सुरु आहे. पण अधिकृत कोणतीही माहीती अद्याप समोर आली नाही.
The last time Rohit Sharma and Virat opened for India in a T20i. pic.twitter.com/n6BxjUbgQ0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 2, 2024
सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “जे काही घडले त्यावर मी आनंदी आहे. सामना अपेक्षित होता. परिस्थितीची सवय करणे महत्त्वाचे आहे. नवीन मैदान आणि खेळपट्टी कमी होणे.” पुढे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या पंतवर भारतीय कर्णधार म्हणाला, “त्याला फक्त एक संधी दिली. आम्ही अजून फलंदाजी बळकट केलेली नाही.”
महत्तवाच्या बातम्या-
रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल नाही तर ‘हे दोन’ खेळाडू करतील विश्वचषकात टीम इंडीयासाठी सलामी
भारत-बांगलादेश सराव सामन्यादरम्यान संजय मांजरेकरांचा रवींद्र जडेजाला टोला!
रोहित ब्रिगेड’ला पाकिस्तानच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून सावध राहावं लागेल, भारताविरुद्ध आहे उत्कृष्ट रेकॉर्ड