भारत विरुद्ध बांग्लादेश कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनच्या कामाचा ताण व्यवस्थापनाबाबत सस्पेंस होता. त्यामुळे या मालिकेविरुद्ध खेळणार का नाही? यावर स्पष्टता नव्हती. पण त्याआधी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो संघाचा भाग असणार आहे. बांग्लादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यानंतर टीम इंडियाचा दौरा करणार आहे, या मालिकेत शाकिब अल हसनच्या खेळावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
बांग्लादेशचे मुख्य निवडकर्ता गाझी अश्रफ हुसैन यांनी स्पष्ट केले आहे की शाकिबने यावर्षी उर्वरित सर्व कसोटी सामन्यांसाठी त्याची उपलब्धता निश्चित केली आहे, याचा अर्थ तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचा भाग असणार आहे
बांग्लादेश पाकिस्तान विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पाकिस्तान दौरा संपल्यानंतर, बांग्लादेशला अनुक्रमे भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी दोन कसोटी सामने खेळायचे आहेत, यापूर्वी शकीबला भारताविरुद्ध खेळायचे नव्हते आणि तो फक्त पाकिस्तान दौऱ्यासाठी उपलब्ध होता. आश्या बातम्या समोर आल्या होत्या. आता अनुभवी अष्टपैलू खेळाडूने वर्षातील उर्वरित सर्व कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असल्याची पुष्टी केली आहे, बांग्लादेश 2024 मध्ये जवळपास आठ कसोटी सामने खेळणार आहे.
मुख्य निवडकर्ता गाझी अश्रफ हुसैन यांनी मीडियाशी बोलताना म्हणाले, “आम्ही जुलैच्या अखेरीस शाकिबशी बोललो, झिम्बाब्वे मालिकेदरम्यान, आम्हाला त्याच्या योजना समजून घ्यायच्या होत्या. आमच्याकडे डिसेंबरपर्यंत आठ कसोटी सामन्यांचे वेळापत्रक आहे, त्याने आम्हाला आश्वासन दिले आहे. तो सर्व सामने खेळणार असल्याचे सांगितले कसोटी आणि प्रत्येक मालिकेपूर्वी सर्व सराव सत्रांमध्ये भाग घेतल्यानंतर तो 14 किंवा 15 ऑगस्टच्या सुमारास संघात सामील होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी बांग्लादेशातील राजकीय गोंधळादरम्यान अश्रफने खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली, शाकिब राजकारणात सक्रिय आहे. बांग्लादेशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि अशा परिस्थितीत खेळाडूंच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 21 ऑगस्ट रोजी रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे.
हेही वाचा-
आधी जिवलग आता कट्टर प्रतिस्पर्धी! रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार
आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्स या 4 खेळाडूंना ठेवणार कायम, परदेशी दिग्गजांचाही समावेश
वयाच्या 40 व्या वर्षी भारतीय विकेटकीपरची ‘घरवापसी’, देशांतर्गत हंगाम खेळण्यास तयार, निवृत्तीबाबतही केलं मोठं वक्तव्य!