भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका गुरुवार (6 फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे. पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होईल. बुधवारी नागपूर एकदिवसीय सामन्यासाठी इंग्लंडने त्यांचा प्लेइंग इलेव्हन जाहीर केला. अनुभवी फलंदाज जो रूटला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले आहे. तो 15 महिन्यांनंतर एकदिवसीय सामना खेळताना दिसणार आहे. त्याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याचा शेवटचा 50 षटकांचा सामना खेळला. या मालिकेद्वारे इंग्लंड आणि भारताचे लक्ष 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची तयारी करण्यावर आहे.
रूट इंग्लंडच्या टी20 संघाचा भाग नव्हता. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघाने भारताविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 ने गमावली. एकदिवसीय सामन्यांमध्येही इंग्लंडकडून बेन डकेट आणि फिल सॉल्ट डावाची सुरुवात करतील. रूट त्याच्या जुन्या तिसऱ्या क्रमांकाच्या स्थानावर खेळेल अशी अपेक्षा आहे. हॅरी ब्रुक चौथ्या क्रमांकावर येईल. कॅप्टन बटलर पाचव्या क्रमांकावर येईल. त्याच्यानंतर अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल यांचा क्रमांक लागतो. इंग्लंडने जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्स आणि साकिब महमूद यांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड केली आहे. तर, अनुभवी फिरकी गोलंदाज आदिल रशीद देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे.
“रूट हा या खेळातील महान खेळाडूंपैकी एक आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे,” असे बटलरने पहिल्या वनडे सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांना बोलताना सांगितले. तो बऱ्याच काळापासून इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याला एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा व्यापक अनुभव आहे. ज्यामुळे आमच्या संघातील कमी अनुभवी खेळाडूंनाही फायदा होईल. “आशा आहे की, तो आगामी सामन्यांमध्ये संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.”
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी इंग्लंडचा संघ – बेन डकेट, फिल साॅल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद
हेही वाचा-
IND vs ENG: पहिल्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11, हा खेळाडू ‘एक्स’फॅक्टर
आयसीसी क्रमवारीत अभिषेक शर्माची गरुड झेप, भल्या-भल्यांना टाकले मागे..!
IND vs ENG; वनडे मालिकेत कोणाचे पारडे जड? मालिकेपूर्वी पाहा संघाचे हेड टू हेड रेकाॅर्ड्स!