बाॅर्डर गावस्कर मालिकेपूर्वी माजी वेगवान गोलंदाज आणि टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. ज्यामध्ये त्यांनी भारतीय संघ पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकणार असल्याचा दावा केला आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला हरवणार असल्याचं चेतन शर्माने म्हटलं आहे. न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर टीम इंडियाचा 3-0 असा पराभव झाला असला तरी दबाव कर्णधार रोहित शर्मावर नसून ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सवर असेल. असा दावाही या माजी क्रिकेटपटूने केला आहे. 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या चार मालिका जिंकल्या आहेत. त्यापैकी दोन मालिका ऑस्ट्रेलियात खेळल्या गेल्या आहेत. मीडियाशी बोलताना चेतन शर्मा म्हणाले, “मला 100 टक्के खात्री आहे की भारत ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला पराभूत करेल. रोहितच्या नेतृत्वाखाली आम्ही ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची हॅट्ट्रिक साधू. भारत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल. आम्ही ऑस्ट्रेलियाला मायदेशात दोनदा पराभूत केले आहे. मालिकेत रोहित शर्मावर नाही तर पॅट कमिन्सवर दबाव आहे.”
तो पुढे म्हणाला, “जेव्हाही टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंड दौऱ्यावर जाते तेव्हा आम्हाला नेहमीच खूप मजा येते. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता भारतीय संघ जेव्हाही परदेशी दौऱ्यावर जातो तेव्हा मालिका जिंकण्यासाठी दावेदार म्हणून जातो. जेव्हा त्यांचे खेळाडू सांगतात. ही एक चांगली मालिका असेल, ते किती घाबरले आहेत ते समजून येते. ऑस्ट्रेलियाने यावर्षी मायदेशात फक्त एकच कसोटी मालिका खेळली आहे. जी दोन सामन्यांची कसोटी मालिका होती. ज्यामध्ये वेस्ट इंडिजने 1-1 अशी बरोबरी साधली होती.
हेही वाचा-
अभिषेक शर्माला डिच्चू, आवेश खानचा पत्ता कट; तिसऱ्या टी20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11
WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेचा मोठा निर्णय, टीम इंडियाची डोकेदुखी वाढली
IND vs SA: तिसऱ्या टी20 मध्ये सेंच्युरियनची खेळपट्टी घातक? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा!