आयपीएल 2025 मेगा लिलाव काल (25 नोव्हेंबर) सोमवारी रात्री 11 वाजता संपला. जेद्दाहमध्ये खेळाडूंबाबत 10 संघांमध्ये दोन दिवस लढत झाली. प्रत्येकाने आपापल्या संघात 18 पेक्षा जास्त खेळाडू आणि 25 किंवा त्यापेक्षा कमी खेळाडूंना स्थान दिले आहे. यानंतर क्रिकेटतज्ञांनी, संघ कसे आहेत आणि लिलावात कोणत्या संघाने चांगली कामगिरी केली? कोणत्या फ्रँचायझीने कमकुवत संघ बनविला किंवा बलाढ्य संघ बनविला किंवा लिलावात काही चुकीचे निर्णय घेतले. याविषयी रेटिंग दिले आहे. दिल्ली कॅपिटल्सला सर्वाधिक गुण मिळाले आहेत.
जियो सिनेमावर बोलताना तज्ञांनी आयपीएल मेगा लिलावाचे रेटिंग केले आहे. लिलावात कोणत्या संघाने चांगली कामगिरी केली आणि चांगला संघ बनवला याबद्दल त्यांनी सांगितले. या रेटिंगमध्ये दिल्ली कॅपिटल्स अव्वल आहे. ज्यांनी 19 खेळाडूंना खरेदी केले. तज्ञांनी दिल्ली कॅपिटल्सला 10 पैकी 8.8 रेटिंग दिले आहे. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु म्हणजेच आरसीबीला सर्वात कमी रेटिंग मिळाले आहे. तज्ञांनी आरसीबीला 7.4 रेटिंग दिले आहे. जे इतर संघांच्या तुलनेत सर्वात कमी रेटिंग आहे.
दिल्लीनंतर सनरायझर्स हैदराबादने लिलावात चांगली खरेदी केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हैदराबादला 8.2 रेटिंग देण्यात आले आहे. तर पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज जे सर्वाधिक पर्स घेऊन आले होते, त्यांना 8-8 रेटिंग मिळाले आहे. पाचव्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज आहे. ज्याला तज्ञांनी 7.9 रेटिंग दिले आहे. गुजरात टायटन्सलाही हेच मानांकन मिळाले आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू विकत घेणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सला 7.8 रेटिंग देण्यात आली. तर, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सला 7.7-7.7 रेटिंग मिळाले. तर शेवटी आरसीबीला 7.4 रेट केले गेले.
तज्ञांचे रेटिंग
8.8 – दिल्ली कॅपिटल्स
8.2 – सनरायजर्स हैदराबाद
8 – मुंबई इंडियन्स
8 – पंजाब किंग्ज
7.9 – चेन्नई सुपरकिंग्ज
7.9 – गुजरात टायट्ंस
7.8 – लखनऊ सुपर जायट्ंस
7.7 – कोलकाता नाइट रायडर्स
7.7 – राजस्थान राॅयल्स
7.4 – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
हेही वाचा-
आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंची यादी, टाॅप-10 मध्ये भारतीयांचा दबदबा
दिल्लीसोबतचं नातं संपल्यानंतर रिषभ पंतची भावनिक पोस्ट, चाहत्यांना उद्देशून म्हणाला…
लिलावात करोडपती झालेल्या 13 वर्षीय खेळाडूवर वयाच्या फसवणुकीचा आरोप