केएल राहुलने आयपीएलसह भारतीय संघात अनेक प्रसंगी दमदार कामगिरी केली आहे. मात्र अलीकडच्या काळात तो फॉर्ममध्ये नाही. आता राहुलच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका रिपोर्टनुसार लखनऊ सुपर जायंट्स राहुलला सोडू शकते. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी, संघांना रिलीज आणि रिटेन्शन लिस्ट जारी करावी लागेल. या संदर्भात लखनऊ राहुलची सुटका करू शकते.
‘टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, लखनऊ सुपर जायंट्सचे संघ व्यवस्थापन केएल राहुलवर खूश नाही. राहुल गेल्या तीन मोसमात संघाचा कर्णधार आहे. पण त्याच्या स्ट्राइक रेटवर व्यवस्थापन नाराज आहे. संघाने झहीर खानला मेंटॉर बनवले आहे. प्रशिक्षक जस्टिन लँगर आहेत. दोघांनीही राहुलच्या आकडेवारीबद्दल बरीच चर्चा केली आहे. गेल्या मोसमातही लखनऊची कामगिरी काही खास नव्हती. या सर्व कारणांमुळे राहुल आता संघाबाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुलने आयपीएल 2022 मध्ये 15 सामने खेळले. या दरम्यान त्याने एका शतकाच्या जोरावर 616 धावा झाल्या. त्याचा स्ट्राइक रेट 135.38 होता. त्याने 2023 मध्ये 9 सामने खेळले. ज्यात 274 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 113.22 होता. या मोसमात त्याने केवळ 4 षटकार मारले होते. यानंतर 2024 मध्ये राहुलने 14 सामने खेळले आणि 520 धावा केल्या. ज्यात त्याचा स्ट्राइक रेट 136.12 होता. त्याच्या स्ट्राईक रेटवर संघ व्यवस्थापन खूश नाही. अहवालानुसार, त्याचा स्ट्राइक रेट खेळाच्या गतीशी जुळत नाही.
लखनऊ सुपर जायंट्स तीन खेळाडूंना कायम ठेवू शकते. या यादीत वेगवान गोलंदाज मयंक यादव, निकोलस पुरन आणि रवी बिश्नोई यांचा समावेश होऊ शकतो. लखनऊ मयंककडे भविष्य म्हणून पाहत आहे. अनुभवाने मयंक अधिक मारक गोलंदाज होऊ शकतो.
हेही वाचा-
IND VS NZ; दुसऱ्या टेस्टपूर्वी शुबमन गिलचा नवा लूक समोर, पाहा व्हायरल फोटो
या अनुभवी फलंदाजाने रचला इतिहास; बांग्लादेशसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच
IND VS AUS; BGT मालिकेसाठी या अष्टपैलू खेळाडूला मिळणार स्थान