आयपीएल 2025 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ज्यात आरसीबीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. आयपीएल 2025 मध्ये फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. साई सुदर्शन, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी चालू हंगामात चांगली कामगिरी केली आहे.
गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 15 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 759 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने शतक आणि 6 अर्धशतके केली आहेत. तो गुजरात टायटन्ससाठी सर्वात मोठा हिरो असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याने स्वतःच्या बळावर संघाला प्लेऑफमध्ये नेले आहे.
आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने चालू हंगामात आतापर्यंत 673 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सचा शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 650 धावा केल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स संघ बाहेर पडला आहे, परंतु त्याचा फलंदाज मिचेल मार्श चालू हंगामात सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 627 धावा केल्या आहेत. सुपर स्टार फलंदाज विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने चालू हंगामात एकूण 614 धावा केल्या आहेत.
आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत एकूण पाच फलंदाजांनी 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये साई सुदर्शन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि मिचेल मार्श यांचा समावेश आहे.
आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू:
साई सुदर्शन- 759 धावा
सूर्यकुमार यादव-673 धावा
शुबमन गिल- 650 धावा
मिचेल मार्श-627 धावा
विराट कोहली-614 धावा






