आयपीएल 2025 मधील सहावा सामना आज (26 मार्च) राजस्थान राॅयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात केकेआरच्या कर्णधाराने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना राजस्थानच्या होम ग्राऊंड गुवाहटी येथे खेळला जात आहे.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन:
कोलकाता नाईट रायडर्स: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थिक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा
जर आपण दोन्ही संघांच्या हेड टू हेड आकडेवारीवर नजर टाकली तर आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही संघांनी समान संख्येने सामने जिंकले आहेत. कोलकाता आणि राजस्थान दोघांनीही प्रत्येकी 14 विजय मिळवले आहेत तर दोन सामन्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणर हे पाहणे रंजक राहील.