---Advertisement---

नाद करा पण रहाणेचा कुठं! सामना गमावला पण KKRच्या कर्णधाराने रचला मोठा विक्रम

On: रविवार, मार्च 23, 2025 9:41 AM
---Advertisement---

KKR VS RCB आरसीबी विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आयपीएलच्या यंदाच्या स्पर्धेतील पहिलं-वहिलं अर्धशतक झळकावण्याचा कारनामा केला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावरील या सामन्यात रहाणेने 4 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊस पाडत 25 चेंडूत अर्धशतक केले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या केकेआर संघाची सुरुवात चांगली झाली नाही. क्विंटन डी कॉक (04) मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्याला जोश हेझलवूडने झेलबाद केले. यानंतर, अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, येताच त्याने गोलंदाजांवर आक्रमण करत वादळी खेळी खेळली, सुयश शर्माने टाकलेल्या 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातील अजिंक्य रहाणेचे अर्धशतक हे या सामन्याचा बेस्ट मुमेंट ठरला.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास केकेआरने पहिल्या डावात खेळताना अजिंक्य रहाणे (56 धावा) आणि सुनिल नारायण (44 धावा) यांच्या खेळीच्या जोरावर मर्यादित 20 षटकात 175 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या सलामी जोडीने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली, फिलीप साॅल्ट आणि विराट कोहली यांनी 8.3 षटकात 95 धावांची भागीदारी केली. ज्यात साॅल्टने 56 धावा केल्या, तर विराट कोहली शेवट पर्यंत नाबाद राहून सामना जिंकवला त्याने 59 धावा ठोकल्या, याशिवाय रजत पाटीदार (34 धावा) लियाम लिव्हिंगस्टोन (15 धावा) यांच्या संघिक खेळीच्या जोरावर आरसीबीने हा सामना 16.2 षटकात आपल्या नावे केला. आशाप्रकारे आरसीबीने गतविजेत्यांवर एकतर्फी विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---