श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (lagends league cricket) खेळत आहे. एलएलसीने अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मुरलीधरन बोलत आहे. व्हिडिओत मुरलीधरनला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) या दोघांपैकी कोणाला गोलंदाजी करणे सोपे होते? असा प्रश्न विचारला गेला. सोबतच त्याच्या विचित्र गोलंदाजी एक्शनविषयी देखील त्याल प्रश्न विचारला गेला. मुरलीधरननेही सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे दिली आहेत.
मुलाखतील मुरलीधरनला सर्वप्रथम प्रश्न विचारला गेला की, “सचिन तेंडुलकर व विरेंद्र सेहवागपैकी कोणाला गोलंदाजी करणे सोपे होते ?” या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, “सचिनला गोलंदाजी करणे सोपे होते.” त्यानंतर त्याला गोलंदाजी एक्शनदरम्यान त्याच्या भीतीदायक चेहऱ्याविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर स्पष्टीकरण देत मुरलीधरन म्हणाला की, “मी त्यावेळी लक्ष केंद्रित करायचो आणि हेदेखील सुनिश्चित करायचो की, फलंदाज उत्साहाने गोलंदाजी करेल. ही एक अशी प्रतिक्रिया आहे, जी स्वाभाविकपणे येते.”
मुरलीधरनला पुढे एक अवघड प्रश्न विचारला गेला. त्याने स्वतःच्या कसोटी कारकिर्दीत ८०० विकेट्स घेतल्या आहेत, तर एकदिवसीय कारकिर्दीत ५०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या दोन्ही प्रकारांमधील प्रदर्शनापैकी कोणत्या विकेट्सला प्राथमिकता देशील असा प्रश्न त्याला विचारला गेला. यावर त्याने क्षणाचाही विलंब न करत उत्तर दिले की, निश्चितच कसोटी क्रिकेटमधील ८०० विकेट्स. त्याव्यतिरिक्त त्याला मुलाखतील सध्याच्या गोलंदाजांपैकी आवडीचा फिरकी गोलंदाज कोण असाही प्रश्न विचारला गेला. यावर तत्काळ उत्तर देत त्याने भारतीय दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विचने नाव घेतले.
दरम्यान, मुरलीधरन लिजेंड्स लीग क्रिकेमध्ये आशिया लायन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये त्याने तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा संघ आशिया लायन्सने खेळलेल्या चार सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत, तर दोनमध्ये पराभव पत्करला आहे. त्यांचा संघ अंतिम सामन्यात वर्ल्ड जायंट्स विरुद्ध खेळताना दिसेल.
महत्वाच्या बातम्या –
दबंग दिल्लीचा दबदबा सुरूच! गुजरातला मात देत काबीज केले पहिले स्थान
“आमच्या कमाईचा हा एकमेव मार्ग”; रणजी ट्रॉफी विजेत्या कर्णधाराने सांगितले विदारक सत्य
शाहीन आफ्रिदीने ‘ड्रीम हॅट्रीक’ साठी घेतली ‘या’ तीन भारतीय खेळाडूंची नावे; म्हणाला…
व्हिडिओ पाहा –