भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. अर्जुनला अद्याप खेळण्यासाठी अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. शनिवारी, 24 सप्टेंबर अर्जुनने त्याचा 23 वा वाढदिवस साजरा केला. मुंबई इंडियन्सने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, अर्जुनचे प्रदर्शन पहिल्यापेक्षा सुधारले आहे.
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो संघासाठी धारदार गोलंदाजी सोबतच फलंदाजी करताना मोठे शॉट्स देखील खेळू शकतो. आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स मागच्या दोन वर्षांपासून त्याला खरेदी करत आहे, पण अद्याप एकदाली प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला खेळवले गेले नाहीये. अर्जुन संघ व्यवस्थापनाच्या अपेक्षांवर खरा उतरत असल्यामुळे त्याला अजून संधी मिळत नसल्याचेही सांगितले जात असते. प्रदर्शन सुधारण्यासाठी तो नेहमीच नेट्समध्ये सराव करत असतो. मुंबईने शेअर केलेल्या व्हिडिओत त्याची गोलंदाजी आधिपेक्षा खूपच सुधारल्याचे दिसत आहे.
मुंबई इंडियन्सने शेअर केलेला व्हिडिओ नेट्समधील आहे. व्हिडिओत त्याने एकूण तीन चेंडू फेकले आहेत. पहिले दोन चेंडूंवर त्याने स्पंप्टवर निशाणा साधला आहे. तर तिसऱ्या चेंडूवर प्रत्यक्ष फलंदाज त्याच्यासमोर आहे. अर्जुनने टाकलेला तिसरा चेंडू एवढा वेगवान आणि अचूक टप्प्यावर पडला होता की, फलंदाजाला त्याला जराही अंदाज आला नाही. चेंडू थेट स्टंप्समध्ये घुसला आणि फलंदाज त्रिफळाचीत झाला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अर्जुनच्या निशाण्याची गोष्टच वेगळी आहे.”
https://www.instagram.com/reel/Ci4mU88jltH/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटच्या आगामी हंगामापासून अर्जुन गोवा संघासाठी खेळताना दिसणार आहे. त्याने यापूर्वी मुंबई संघासोबत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दोन टी-20 सामने खेळले होते. यावर्षीच्या रणजी हंगामात देखील तो मुंबई संघाचा भाग होता, पण त्याला प्लेइंग इळेव्हनमध्ये संधी दिली गेली नव्हती. प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याच्या उद्देशानेच त्याने गोवा संघाचा हात धरल्याचे सांगितल जात आहे. मागच्या काही दिवसांमध्ये अर्जुनचे काही फोटो देखील चांगलेच व्हायरल होत आहेत. यामध्ये तो माजी अष्टपैलू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेताना दिसत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
निर्णायक सामन्यात नाणेफेक भारताच्या बाजूने! प्रथम गोलंदाजीचा निर्णय; भुवनेश्वरचे पुनरागमन
देशांतर्गत क्रिकेटबद्दल ‘चॅम्पियन’ कर्णधार रहाणेचे लक्षवेधी विधान; म्हणाला…