---Advertisement---

SRH vs LSG: ‘हा’ ठरला लखनऊच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

---Advertisement---

SRH vs LSG) यंदाच्या आयपीएलमधील सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनऊने हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. संघाने 5 विकेट्सने हैदराबादला हरवले.

टाॅस गमावल्यानंतर पहिल्या डाावात खेळताना हैदराबादने मर्यादित 20 षटकात 190 धावा केल्या, लखनऊच्या गोलंदाजांनी सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. सनरायझर्सच्या विस्फोटक फलंदाजी युनिट समोर लखनऊने त्यांना 200 धावांच्या आत रोखले शिवाय 9 विकेट्सही घेतल्या, शार्दुल ठाकुरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 47 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना, लखनऊ सुपर जायंट्सने निकोलस पूरन व मिशेल मार्श यांच्या उत्कृष्ट अर्धशतकी खेळीच्या जोरावर सामना एकतर्फी जिंकण्यात यशस्वी झाला. ज्यात निकोलस पूरनने हैदराबादच्या गोलंदाजांना धो धो धुतले. त्याने 26 चेंडूत 70 धावांची विस्फोटक खेळी खेळला. त्याच्या या खेळीत त्याने 6 चाैकार व 6 चाैकार हणल्या, निकोलस पूरनच्या या खेळीमुळे लखनऊने एकतर्फी सामना जिंकला. आशाप्रकारे 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग लखनऊने 16.1 षटकात पूर्ण केला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---