पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला सुरूवात झाली आहे. भारतासाठी पहिला दिवस खूप चांगला होता. भारताच्या पुरुष आणि महिला तिरंदाजी संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी (25 जुलै) झालेल्या सामन्यात भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताच्या महिला संघात दीपिका कुमारी, अंकिता भकट आणि भजन कौर यांचा समावेश आहे. पुरुष संघात धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांचा समावेश आहे.
भारताचे पुरुष थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. भारत 2013 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये कोरिया अव्वल राहिला. त्यांना 2049 गुण मिळाले आहेत. तर फ्रान्स 2025 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर चीन, जपान आणि इटलीसह अनेक देशांना मागे टाकले.
भारतीय पुरुष संघाचे तिरंदाज वैयक्तिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहेत. धीरजने 681 गुण मिळवले. यामध्ये कोरियाचा किम वूजिंग अव्वल राहिला. भारताचा तरुणदीप राय 14 व्या क्रमांकावर राहिला. त्याला 674 गुण मिळाले. तर प्रवीण जाधव 39व्या स्थानावर राहिला.
महिला संघानेही चमकदार कामगिरी केली. भारताचा महिला तिरंदाजी संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अंकिता 11व्या स्थानावर आहे. भजन कौर 22 व्या क्रमांकावर राहिली. तर दीपिका 23व्या क्रमांकावर आहे. भारताचा महिला तिरंदाजी संघ चौथ्या क्रमांकावर होता. त्याला 1983 गुण मिळाले. यामध्ये कोरिया अव्वल राहिला. तर चीन दुसऱ्या स्थानावर राहिला. मेक्सिको तिसऱ्या स्थानावर आहे.
आता भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी मैदानात उतरणार आहेत. भारताचा नेमबाजी संघ 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. यानंतर पात्रतेसाठी स्पर्धा होईल. भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा सामना केविन कॉर्डनशी होणार आहे.
हेही वाचा-
Asia Cup 2024: सेमीफायनल सामन्यापूर्वी भारताच्या स्टार खेळाडूनं केलं मोठं वक्तव्य!
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने केले दुर्लक्षित, आता ऋतुराज गायकवाड बनला ‘या’ संघाचा कर्णधार
IND vs SL: भारत विरुद्ध श्रीलंका टी20 सामन्यावर पावसाचं सावट