---Advertisement---

एमपीएलच्या दुसऱ्या हंगामासाठी रत्नागिरी जेट्स सज्ज, नव्या कोऱ्या जर्सीचे केले अनावरण । MPL 2024

On: मंगळवार, मे 28, 2024 7:18 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम 2 जूनपासून सुरू होत आहे. या महान स्पर्धेच्या नव्या हंगामाची अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते. महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाचे विजेते रत्नागिरी जेट्स संघाने पटकावले होते. याच संघाने आता नव्या हंगामासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.

जेट्सच्या जर्सीच्या अनावरण प्रसंगी संघाचे मालक राजन नवानी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. नवीन जर्सी निळ्या रंगाची आहे. जी पराक्रमी समुद्राचे प्रतिनिधित्व करते. रत्नागिरी जेट्सचे मालक राजन नावानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “रत्नागिरी जेट्सला एमपीएलमध्ये उच्च दर्जाचे प्रदर्शन करायचे आहे आणि जेट सिंथेसिसलाही खात्री आहे की, ही फ्रँचायझी आगामी हंगामात नक्कीच आपली छाप सोडेल. आम्ही आमच्या संघातील सर्व खेळाडूंना आगामी हंगामासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो.”

जेट सिंथेसिस आणि रत्नागिरी जेट्सचे मालक राकेश नवानी पुढे असेही म्हणाले, “आम्ही येणाऱ्या आव्हानांसाठी पूर्णपणे तयार आहोत. आमच्या संघाला आम्ही आगामी हंगामासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो.”

संघाचे मुख्य प्रशिक्षक रणजीत पांडे म्हणाले, “या अप्रतिम स्पर्धेचा लिलाव खूप यशस्वी झाला. आमच्या संघाने सरावही सुरू केला आहे. आपल्या क्षमतेनुसार आणखी चांगले खेळण्याचा आमचा विचार आहे. आमचा संघ खूप चांगला आहे. आम्ही पहिल्या हंगामात जसं खेळलो तसंच या हंगामातही आम्हाला खेळायला आवडेल. आमच्या संघात अनेक चांगले खेळाडू आहेत, जे आगामी हंगामात त्यांची छाप सोडू इच्छितात.”

रत्नागिरी जेट्सचा कर्णधार अझिम काझी यावेळी म्हणाला, “आम्ही सर्वजण आगामी हंगामासाठी पूर्णपणे तयार आहोत. आगामी हंगामात सर्व खेळाडू एक संघ म्हणून खेळताना दिसणार आहेत. आम्हा सर्वांना जी काही भूमिका दिली जाईल, त्यानुसार आम्ही भूमिका बजावू. चाहते आणखी एका चांगल्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आम्ही त्यांना अजिबात निराश करणार नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 नोव्हेंबर पासून सुरुवात

मोठी अपडेट: MPL 2024चे वेळापत्रक जाहीर, पाहा तुमच्या आवडत्या टीमचे वेळापत्रक

मोठी बातमी ! फ्रेंच ओपन 2024 स्पर्धेतून राफेल नदाल ‘आऊट’, पहिल्याच फेरीत चॅम्पियन ‘राफा’ पराभूत । French Open 2024

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---