भारतीय क्रिकेट वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांनी काल (शुक्रवारी 15 नोव्हेंबरला) दुसऱ्या बाळाचे स्वागत केले. रोहित आणि रितिका 2015 मध्ये लग्न बंधनात अडकले होते. त्यानंतर 2018 मध्ये जन्मलेली लेक समायरा हे या जोडीचं पहिलं अपत्य आहे. आता ही जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा झालीये. मात्र दोघांनी अधिकृतरित्या यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. पण सोशल मीडियावरही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आहे. रितिकानं बेबी बॉयला जन्म दिला याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. जोडप्याच्या बेबी बॉयसाठी सोशल मीडियावर ज्यूनिअर हिटमॅन हा ट्रेंड सेट झाला आहे.
Rohit Sharma and Ritika have been blessed with a baby boy. 👦
– Many congratulations to them! 🥺❤️ pic.twitter.com/2zergbSj2u
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2024
रोहित शर्माबाबत असे मानले जात होते की, त्याच्या दुसऱ्या अपत्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्याला मुकावू शकतो. मात्र, ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या सुमारे 6 दिवस आधी त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. अशा परिस्थितीत रोहित शर्माकडे आता या सामन्यासाठी संघात सामील होण्यासाठी पूर्ण वेळ आहे. रोहित लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो.
टीम इंडियाचा कर्णधार असण्यासोबतच रोहित शर्माला ऑस्ट्रेलियात खेळण्याचाही अनुभव आहे. रोहित शर्मा हा सलामीवीर आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला त्याची विशेष गरज आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टिकोनातून टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा जितक्या लवकर संघात सामील होईल तितक्या लवकर भारतीय चाहत्यांसाठी आणि संघासाठी चांगलं असेल.
ऑस्ट्रेलियातील कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर तीन अर्धशतके आहेत. तो अजूनही पहिल्या शतकाचा शोधात आहे. रोहित शर्मा लवकरच संघात सामील झाल्यामुळे टीम इंडियाच्या बॅटिंग लाइनअपला फायदा होईल. याशिवाय ऑस्ट्रेलियातील सराव सत्रादरम्यान टीम इंडियाचे काही खेळाडू जखमी झाले. रोहित शर्माच्या आगमनाने त्या खेळाडूंवर खेळण्याचे फारसे दडपण राहणार नाही.
हेही वाचा-
टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये केला मोठा चमत्कार, पहिल्यांदाच घडले हे ऐतिहासिक विक्रम
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेचा दारुण पराभव, मालिका 3-1 ने खिश्यात
संजू सॅमसन, तिलक वर्माचे झंझावाती शतक! भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे उभारला 283 धावांचा डोंगर