सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना 135 धावांनी जिंकून मालिका 3-1 ने जिंकली. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्याकडून आतषी फलंदाजी पाहायला मिळाली. ज्यामध्ये भारताने 20 षटकांत 1 विकेट गमावून 283 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 18.2 षटकांत 148 धावांवरच मर्यादित राहिला. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने भारतीय संघाकडून सर्वाधिक 3 बळी घेतले.
एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत अत्यंत खराब कामगिरी झाली होती. ज्यामध्ये मालिकेतील शेवटच्या सामन्यात आफ्रिकन संघाच्या गोलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. ज्यामध्ये टीम इंडिया 283 पर्यंत धावसंख्या गाठली. लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघ केवळ 148 धावा करू शकला. ज्यामध्ये त्याची सुरुवात खूपच खराब झाली. आफ्रिकेने पहिल्या चार विकेट केवळ 10 धावांवर गमावल्या होत्या. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. याआधी त्यांना गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच टी20 आंतरराष्ट्रीय मधील धावांच्या फरकाच्या बाबतीत भारताचा हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे.
या टी-20 मालिकेत टीम इंडियासाठी संजू सॅमसन आणि तिलक वर्मा फलंदाजीत चमकदार असताना वरुण चक्रवर्ती गोलंदाजीत आपला प्रभाव दाखवण्यात यशस्वी ठरला. या मालिकेत तिलकने चार डावात 140 च्या सरासरीने 280 धावा केल्या, तर संजूनेही या मालिकेत 72 च्या सरासरीने 216 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने चार सामन्यांत 11.50 च्या सरासरीने एकूण 12 विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंगलाही 8 विकेट्स घेण्यात यश आले.
हेही वाचा-
संजू सॅमसन, तिलक वर्माचे झंझावाती शतक! भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे उभारला 283 धावांचा डोंगर
13 वर्षांचा मुलगा ऑक्शनमध्ये उतरणार! मेगा लिलावातील सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू जाणून घ्या
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीत ‘या’ 3 खेळाडूंचा चिंताग्रस्त फाॅर्म वाढवणार भारतीय संघाचं टेन्शन!






