---Advertisement---

SA VS PAK; कर्णधार रिझवानची संथ खेळी, बाबर आझम पुन्हा फेल, पाकिस्तानचा निसटता पराभव

On: बुधवार, डिसेंबर 11, 2024 7:44 AM
---Advertisement---

सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. ज्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना काल (10 डिसेंबर) मंगळवारी खेळला गेला. ज्यामध्ये यजमान आफ्रिकेने पाकिस्तान संघाचा 11 धावांनी पराभव केला. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात खेळताना 183 धावा केल्या होत्या. पण प्रत्युत्तरात पाकिस्तानला निर्धारित 20 षटकात केवळ 172 धावा करता आल्या आणि 11 धावांनी सामना गमावला. या सामन्याचा स्टार जॉर्ज लिंडे होता. ज्याने 4 विकेट्स घेण्यासोबतच बॅटने देखील अप्रतिम खेळी खेळली.

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा संघाला फारसा फायदा झाला नाही. रीझा हेंड्रिक्ससह तिन्ही आघाडीचे फलंदाज 28 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. पण यानंतर डेव्हिड मिलरने आपली जादू चालवली. त्याने दबावाला न जुमानता 40 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकारही मारले. त्याच्याशिवाय जॉर्ज लिंडेही मोलाची कामगिरी केली. त्याने 24 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह 48 धावा केल्या.

184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला तेव्हा कर्णधार मोहम्मद रिझवानने एका टोक सांभाळून संघाचे नेतृत्व केले. मात्र बाबर आझम पुन्हा शून्य धावसंख्यावर बाद झाला. सॅम अयुबने 31 धावांची झंझावाती खेळी करत रिझवानला निश्चितच काही काळ साथ दिली. पण पॉवरप्लेनंतर लगेचच तोही पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात रिझवानने 74 धावा केल्या. जॉर्ज लिंडे आणि क्वेना माफाका यांच्या घातक गोलंदाजीमुळे आफ्रिकेला हा सामना 11 धावांनी जिंकण्यात यश आले.

या वर्षी 2024 मध्ये पाकिस्तानचा टी20 रेकॉर्ड फारसा चांगला राहिला नाही. या वर्षी पाकिस्तानने आतापर्यंत 26 टी20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 9 विजयांच्या तुलनेत त्यांना 16 पराभवांचा सामना करावा लागला आहे. अलीकडेच झिम्बाब्वेकडून टी20 सामन्यातही पराभव स्वीकारावा लागला होता. खरे तर कर्णधार रिझवानने चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली असती तर पाकिस्तान संघ हा सामना सहज जिंकू शकला असता.

हेही वाचा-

IND vs AUS; भारतीय संघात बदल होणार? माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
भारतीय संघाच्या जर्सीवर नाव लिहिण्यासाठी किती पैसे घेते BCCI?
थेट अंपायरलाच दिल्या शिव्या, आयसीसीने केली मोठी कारवाई!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---