नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछानेचे 2024 च्या टी20 विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. अमेरिकेने संदीपला दुसऱ्यांदा व्हिसा देण्यास नकार दिला आहे. नेपाळने टी20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला त्यावेळी संदीप बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात कैद होता. मात्र आता न्यायालयाने संदीपला बलात्कार प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. पण तरीही त्याला विश्वचषकासाठी अमेरिकेचा व्हिसा मिळाला नाही.
तत्पूर्वी संदीपविरोधात ऑक्टोबर 2022 मध्ये एका 17 वर्षीय मुलीने काठमांडू येथील एका हॉटेलच्या खोलीत ऑगस्टमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा न्यायलयातून संदीपवर आठ वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण त्यानंतर पाटण उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या पॅनेलने काठमांडू जिल्हा न्यायालयाचा निर्णय फेटाळण्याचा निर्णय दिला.
बलात्कार प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर आता संदीप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संदीपने अमेरिकेला व्हिसासाठी अर्जही केला, मात्र नेपाळमधील अमेरिकन दूतावासाने त्याचा व्हिसा नाकारला.
पहिल्यांदा व्हिसा नाकारण्यात आलेल्या संदीपने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली खदखद मांडली होती. 2019 मध्येही अमेरिकन दूतावासाने त्याच्याशी असेच केले होते ते सांगितले होते. संदीपने लिहिले, “यूएस दूतावासाने पुन्हा तेच केले आहे जे की त्यांनी 2019 मध्ये केले होते त्यांनी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी माझा व्हिसा नाकारला. नेपाळ क्रिकेटच्या सर्व हितचिंतकांचा मी दिलगीरी आहे.”
पण आता दुसऱ्यांदा नेपाळ सरकारच्या हस्तक्षेप करुन देखील संदीपचा व्हिसा अमेरिकन दूतावासाने पून्हा नाकारले आहे.
महत्तवाच्या बातम्या-
यंदाच्या टी20 विश्वचषकात अनेक विक्रम मोडित निघणार, ‘या’ दिग्गज खेळाडूंवर राहणार नजर
टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्यात ‘किंग कोहली’ अव्वल स्थानी; तर स्ट्राईक रेट बाबतीत जोस बटलर ‘टाॅपर’
भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी सौरव गांगुलीनं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “एखाद्याच्या आयुष्यात प्रशिक्षकाचे…”