सचिन तेंडुलकरला एकदा एका कार्यक्रमादरम्यान विचारण्यात आले की त्याचे रेकॉर्ड कोण मोडू शकेल? तेव्हा त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माची नावे घेतली होती. या दोन भारतीय खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम मोडीत काढले. मात्र आता त्यांच्या निवृत्तीची वेळ जवळ आली आहे. या दोन्ही खेळाडूंनी टी20 मधून निवृत्ती घेतली आहे. पण तरीही ते वनडे आणि कसोटी खेळत आहेत. रोहित शर्मा आता 37 वर्षांचा आहे. तर विराट कोहली नोव्हेंबरमध्ये 36 वर्षांचा होईल. अशा स्थितीत त्यांची जागा कोणी भरणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अशा परिस्थितीत अनुभवी लेगस्पिनर पियुष चावलाने शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांची नावे घेतली.
पियुष चावलाला वाटते की, आगामी काळात गिल आणि गायकवाड हे भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जागा घेऊ शकतात. मात्र, गायकवाडला संघात स्थान मिळवण्यासाठी अजूनही धडपड सुरू असल्याने ते सोपे जाणार नाही. असंही तो म्हणाला.
शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना पियुष चावला म्हणाला, “शुबमन गिल, कारण त्याची खेळण्याची टेकनीक आहे, जेव्हा तुम्ही थोडाश्या खराब फॉर्म मध्ये असला, तरी पण तांत्रिकदृष्ट्या मजबूत असलेला फलंदाज खराब फॉर्ममधून लवकर बाहेर पडतो. ज्या फलंदाजाकडे चांगले तंत्र आहे तो फार काळ खराब फॉर्ममध्ये राहू शकत नाही. त्यामुळे माझ्यासाठी शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड नक्कीच बेस्ट आहेत.
2021 मध्ये पदार्पण करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत भारतासाठी 6 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्याच्या नावावर एक टी-20 शतक आहे. त्याला संघात सातत्याने स्थान निर्माण करता आलेले नाही. यावर चावला म्हणाला, “हे पार्ट अँड पार्सल आहे, ते चालूच राहील. पण तुम्ही बघा, जेव्हाही त्याला संधी मिळाले आहे, तेव्हा त्याने चांगलीच कामगिरी केली आहे. त्यामुळे हे दोन खेळाडू माझ्यासाठी खास आहेत”.
हेही वाचा-
बांग्लादेशविरुद्धच्या कसोटीपूर्वी टीम इंडिया चेन्नईत दाखल, सामन्यापूर्वी सराव सत्राचे आयोजन
IND VS BAN; टीम इंडियाचे हे तीन गोलंदाज बांग्लादेशविरुद्ध गेम चेंजर ठरणार
बालपणी सोसली गरिबीची झळ, आता गलेलठ्ठ संपत्तीचे मालक आहेत हे भारतीय क्रिकेटर