आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलद्वारे टी 20 जागतीक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला टी20 आंतरराष्ट्रीय ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ चा पुरस्कार दिला आहे. सूर्याच्या नावे टी 20 क्रमवारीत 861 रेंटिग आहेत. तसेच आयसीसी क्रमवारीत असलेल्या भारतीय संघातील अन्य खेळाडूंना देखील पुरस्करांनी सन्मानित केले.
वर्षभरातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू व्यतिरिक्त सूर्यकुमार यादवला ‘टी 20 आय टीम ऑफ द इयर’ कॅप देखील मिळाली. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगलाही ‘ट्वेन्टी-20 टीम ऑफ द इयर’ची कॅप देण्यात आली. याशिवाय भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’ कॅप देण्यात आली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी जडेजाला ही कॅप दिली. आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत रवींद्र जडेजा 444 रेंटिगसह अव्व्ल स्थानी आहे.
कर्णाधार रोहित शर्मा, शुबमन गिल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनाही ‘आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर’ची कॅप देण्यात आली.
शुबमन गिल आयसीसीच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीत 801 रेंटिगसह दुसऱ्या तर कर्णाधार रोहित शर्मा 746 रेंटिगसह चाैथ्या स्थानी आहे. तर गोलंदाजीत मोहम्मद सिराज 678 रेंटिगसह चाैथ्या क्रमांकावर आणि कुलदीप यादव आठव्या स्थानी आहे. त्याच्यानावे 645 रेंटिग आहेत.
आयसीसीच्या अलिकडच्या क्रमवारीनुसार, भारतीय संघ टी 20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत 264 रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम आहे. याआधीही टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर होती.तर दुसरीकडे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीतही 122 रेंटिगसह अव्व्ल स्थानी आहे. आणि आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाकडे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत 120 रेंटिग आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया 124 रेंटिगसह अव्व्ल स्थानी आहे.
भारतीय संघ टी 20 विश्वचषकातील पहिला सामना 5 जून रोजी आर्यलँड विरुद्ध खेळणार आहे. तर स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध 9 जून रोजी न्यूयाॅर्क येथील नव्याने बांधलेल्या नासाऊ च्या काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्तपूर्वी टीम इंडीया आपला पहिला सराव सामना 1 जून रोजी बांग्लादेश विरुध्द खेळणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
आयसीसी टी20 रँकिंगच्या शीर्ष स्थानी आहे ‘हा’ संघ जाणून घ्या कोणत्या संघाचे वर्चस्व?
मोठी बातमी! प्रज्ञानानंदाने रचला इतिहास मॅग्नस कार्लसनचा केला नाॅर्वे बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेमध्ये प्रथमच पराभव
‘विराट कोहली-यशस्वी जयस्वाल’ सलामी मोर्चा सांभाळावा रोहित चाैथ्या क्रमांकावर फीट विश्वचषकापूर्वी ‘या’ दिग्गजाने दिला सल्ला