टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केली आहे. अक्षर पटेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषीत केले आहे की, तो लवकरच पिता होणार आहे. त्याची पत्नी मेहा पटेल सध्या गरोदर आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांनी पुष्टी केली होती की ते लवकरच दोघांचे तीन होऊ शकतात. आता काही दिवसांनी त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र, अक्षर पटेलने त्याच्या इंस्टाग्रामवर जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात तो कधी पिता होणार आहे, याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. व्हिडिओ मध्ये त्याने मेहा पटेलला टॅग केले आहे.
अक्षर पटेलने त्याच्या आणि मेहाच्या कुटुंबासोबत एक कार्यक्रम आयोजित केला. ज्यामध्ये अनेक विधी पार पडले. अक्षर पटेलची पत्नी आहारतज्ज्ञ आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दोघांचे लग्न झाले. जेव्हा कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये अक्षर पटेलला विचारण्यात आले की जेव्हा, तो त्याच्या शोमध्ये पहिल्यांदा आला तेव्हा तो सिंगल होता, जेव्हा तो दुसऱ्यांदा त्याच्या शोमध्ये आला तेव्हा त्याचे लग्न झाले, आणि आता तो तिसऱ्यांदा त्याच्या शोमध्ये आला आहे. तर या वेळी कोणती तर चांगली बातमी आहे का? यावर अक्षर म्हणाला होता की हो असे होऊ शकते. पण याविषयी तो उघडपणे बोलला नसला तरी आता त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
View this post on Instagram
अक्षर पटेल हा भारताच्या कसोटी संघाचा भाग होता. त्याला बांग्लादेशविरुद्ध टी20 संघात स्थान देण्यात आले नाही. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. यावेळी त्याला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. अक्षर पटेल 2024 च्या टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग आहे. तो या फाॅरमॅटमध्ये नियमितपणे खेळताना दिसेल. कारण रवींद्र जडेजाने निवृत्ती घेतली आहे.
हेही वाचा-
क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! टीम इंडिया एकाच वेळी दोन सामने खेळणार
5-5 षटकांचा सामना, संघात केवळ 6 खेळाडू, या अनोख्या स्पर्धेत टीम इंडिया घेणार भाग
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज