टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला आज टी20 मध्ये पदार्पण करुन 14 वर्षे पूर्ण झाली आहेत, विराटने 12 जून 2010 मध्ये झिमब्बावे विरुद्ध पदार्पण केले होते. त्या सामन्यात विराटने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत नाबाद 21 चेंडूत 26 धावा केल्या होत्या.
भारतीय संघासाठी विराट कोहलीचे मोलाचे योगदान आहे. जागतिक क्रमवारीत टी20 मध्ये सर्वाधिक करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 119 सामन्यात 50.42 च्या सरासरीने 4042 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतकी 37 अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. तर गोलंदाजीत त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान विराटने टीम इंडियासाठी 50 टी20 सामन्यात संघाचे नेतृत्तव केले ज्यात त्याने 30 सामन्यात भारतासाठी विजय मिळवून दिला आहे,
14 वर्षाच्या कार्यकाळात विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. टी20 विश्वचषकात त्याने टीम इंडियासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या नावे टी20 विश्वचषकात सर्वाधिक सामनावीरचा पुरस्कार जिंकला आहे. तर टी20 विश्वषकात सर्वाधिक दोनदा मालिकावीरचा पुरस्कार जिंकला आहे. तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याने टीम इंडियासाठी सर्वाधिक 15 सामन्यात ‘सामनावीर’ तसेच 7 टी20 मालिकेत ‘प्लेअर ऑफ द सिरिजचा’ पुरस्कार जिंकला आहे. टी20 विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही त्याच्या नावे आहे.
विराट कोहली आणि टी20 विश्वचषक दोघांच वेगळे नाते आहे. त्याने टी20 विश्वचषकाच्या नाॅक आउट सामन्यात दर्जेदार खेळी खेळली आहे. तो विश्वचषकात 4 नाॅक आउट सामने खेळला आहे, आणि चारही सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आहे. 2014 च्या सेमी-फायनल आणि फायनल , तर 2016 आणि 2022 च्या सेमीफायनल मध्ये अर्धशतके केल्या आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
भज्जीचा राग शांत होईना! कामरान अकमलला म्हटलं ‘नालायक’, शिखांच्या इतिहासाची आठवण करून दिली
आजच होणार पाकिस्तानचा पत्ता कट! अमेरिका पोहचणार सुपर 8 मध्ये, पण कसं? ते जाणून घ्या
पावसामुळे नेपाळ-श्रीलंकेची चिंता वाढली, दक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये दाखल