---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी का बांधली दंडावर काळ्या रंगाची पट्टी? भारताशी होता संबंध

On: गुरूवार, नोव्हेंबर 11, 2021 3:19 PM
eoin-kane
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये बुधवारी (१० नोव्हेंबर) उपांत्य फेरीचा सामना पार पडला. हे दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने येत असतात तेव्हा चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. या सामन्यात न्यूझीलंड संघाने २०१९ विश्वचषक पराभवाचा बदला घेत, उपांत्य फेरीच्या सामन्यात जोरदार विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते. काय होते यामगचे खरे कारण? जाणून घ्या.

दोन्ही संघातील खेळाडू जेव्हा राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरले होते. त्यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली होती. दोन्ही संघातील खेळाडूंनी अबुधाबी स्टेडियमचे पिच क्युरेटर मोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हाताला काळी पट्टी बांधली होती. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी मोहन यांचा मृत्यू झाला होता.

मोहन यांचा मृत्यू का झाला होता, यामागील खरे कारण काय आहे अजूनही समजू शकलेल नाहीये. मोहन हे मोहालीचे रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबाची परवानगी मिळाल्यानंतर अफगानिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना होऊ शकला होता. तसेच इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळले. यावेळी स्टेडियममधील सदस्य आणि उपस्थित प्रेक्षकही यात सहभागी झाले होते.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीने नाबाद ५१ धावांची तुफानी खेळी केली. तर डेविड मलानने ४१ आणि जोस बटलरने २९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला २० षटक अखेर ४ बाद १६६ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून डेरिल मिचेलने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर डेवॉन कॉनवेने ४६ धावांचे महत्वपूर्ण योगदान देत हा सामना न्यूझीलंड संघाला जिंकून दिला. न्यूझीलंड संघाने आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथमच प्रवेश केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---