भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला शुक्रवारी (27 जानेवारी) सुरुवात झाली. मालिकेतील हा पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला गेला. वनडे मालिकेत एकतर्फी पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. खेळाच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघावर वर्चस्व गाजवत न्यूझीलंडने 21 धावांनी मोठा विजय संपादन केला.
1ST T20I. New Zealand Won by 21 Run(s) https://t.co/gyRPMYVaCc #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 27, 2023
भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फिन ऍलनने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करत 23 चेंडूवर 35 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर डेवॉन कॉनवे याने जबाबदारी सांभाळत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतकानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. सुरुवातीला सांभाळून खेळत असलेल्या डॅरिल मिशेल याने अखेरच्या षटकात 27 धावा वसूल करत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. सोबतच त्याने न्यूझीलंडला 176 पर्यंत मजल मारून दिली. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर याने 2 बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. शुबमन गिल, इशान किशन व राहुल त्रिपाठी हे आघाडीचे तीन फलंदाज भारताने अवघ्या 15 धावांमध्ये गमावले. त्यानंतर सूर्यकुमार यादव व कर्णधार हार्दिक पंड्या यांनी 68 धावांची भागीदारी करत संघाला पुनरागमन करून दिले. मात्र, दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या ईश सोढी याने एका षटकात या दोघांना बाद करत सामना बदलला. सर्व प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने प्रतिकार करत 25 चेंडूंवर अर्धशतक केले. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. परिणामी, भारतीय संघाला 21 धावांनी पराभूत व्हावे लागले.
(Newzealand Beat India In Ranchi T20I By 21 Runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! हवेत उडी मारून वॉशिंग्टनने घेतला ‘सुंदर’ कॅच; बीसीसीआयही म्हणाली, ‘व्वा काय झेल आहे’
‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’सारखीच आहे ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाची लव्हस्टोरी, प्रेमासाठी थेट…