क्रिकेट इतिहासात प्रथमच स्कॉटलंड दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. एडिनबर्गे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडने तब्बल ६८ धावांनी मोठा विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. तुफानी शतक झळकावणारा न्यूझीलंडचा युवा सलामीवीर फिन ऍलन सामन्याचा मानकरी ठरला.
१९९८ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध एकमेव वनडे सामना खेळलेला न्यूझीलंड संघ २४ वर्षानंतर स्कॉटलंडविरुद्ध उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे स्कॉटलंड या मालिकेचे यजमान आहेत. दोन टी२० व एक वनडे सामना या दौऱ्यावर खेळला जाईल.
टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात स्कॉटलंडचा कर्णधार रिची बॅरिंग्टन याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर मार्टिन गप्टिल व फिन ऍलन यांनी चुकीचा ठरवला. त्यांनी संघाला ८.५ षटकात ८५ धावांची सलामी दिली. गप्टिल ४० धावा काढून बाद झाला. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्यानंतर आलेल्या डॅरिल मिचेल, जिमी निशाम व ग्लेन फिलिप्स यांनीही बहुमूल्य योगदान दिले. मात्र, २१ वर्षीय फिन ऍलनने आपल्या टी२० कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण करत संघाला २२५ पर्यंत मारून दिली. ही न्यूझीलंडच्या टी२० इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या स्कॉटलंडसाठी मन्सी व मॅकलॉईड यांनी ६२ धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर क्रिस ग्रेव वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. परिणामी, स्कॉटलंडचा डाव ८ बाद १५७ पर्यंत मर्यादित राहिला. न्यूझीलंडसाठी ईश सोढीने सर्वाधिक ४ बळी मिळवले. मालिकेतील दुसरा सामना २९ जुलै रोजी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
हा माजी भारतीय क्रिकेटर म्हणतोय,”सात-सात तास वनडे क्रिकेट कोण पाहणार?”
प्रेग्नेंसीनंतर ‘ही’ भारतीय महिला क्रिकेटर परतणार मैदानावर, बनणार पहिलीच क्रिकेटर
शास्त्री म्हणतायेत, “सचिनसारखा किडा आत्ताच्या टीम इंडियातील कोणातच नाही”