न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिला सामना शनिवारी (25 मार्च) खेळला गेला. ऑकलंड येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. फलंदाजांनी उभारलेल्या 274 धावांचा बचाव करताना गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 78 धावांवर गुंडाळत 198 धावांनी मोठा विजय संघाला मिळवून दिला. वेगवान गोलंदाज हेन्री शिप्ली याने पाच बळी मिळवले.
Complete domination from New Zealand as Sri Lanka suffer a heavy defeat in Auckland 💪#NZvSL | #CWCSL | 📝: https://t.co/okbhhuKx7T pic.twitter.com/YrLy9Tc7Jt
— ICC (@ICC) March 25, 2023
श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बो याच्या रूपाने त्यांना पहिले यश लवकर मिळाले. विल यंग व फिन ऍलन यांनी त्यानंतर संघाचा डाव पुढे नेला. यंग 26 धावा करून माघारी परतला. तर, ऍलनने शानदार अर्धशतक साजरे केले. त्यानंतर मध्यफळी व खालच्या फळीतील फलंदाजांनी संघाची धावसंख्या वाढत ठेवली. डॅरिल मिचेलने 47, ग्लेन फिलिप्स याने 39 व रचिन रविंद्रने 49 धावांचे योगदान देत संघाला 274 पर्यंत मजल मारून दिली. श्रीलंकेसाठी चमिका करूणारत्ने याने सर्वाधिक चार बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव पहिल्यापासून सावरलाच नाही. शिप्ली याच्या गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने आपले पहिले पाच फलंदाज केवळ 31 धावांवर गमावले. अनुभवी ऍंजेलो मॅथ्यूज याने श्रीलंकेसाठी सर्वाधिक 18 धावा केल्या. शिप्ली याच्या पाच तसेच मिचेल व टिकनर यांच्या प्रत्येकी दोन बळींच्या जोरावर श्रीलंकेचा डाव 19.5 षटकात 78 धावांवर संपुष्टात आला. पाच बळी मिळवणाऱ्या शिप्ली यास सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना 28 मार्च रोजी खेळला जाईल. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर उभय संघांमध्ये टी20 मालिका खेळली जाणार आहे.
(Newzealand Beat Srilanka By 198 Runs In First ODI Srilanka All Out On 78)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
योगायोग असावे तर असे! 2008 ची सीएसके आणि WPL च्या मुंबई इंडियन्सचे जुळून आलेले जबरदस्त साधर्म्य
अफगाणिस्तान क्रिकेटचा सुवर्णदिन! इतिहासात प्रथमच नोंदवला पाकिस्तानवर विजय, नबी चमकला