जून महिन्याच्या १८ ते २२ तारखेदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. साऊथहॅम्पटन येथील मैदानावर हा सामना खेळवला जाईल. या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचला असून भारतीय संघ, २ जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. या बहुप्रतीक्षित अंतिम सामन्यात सर्वांच्या नजरा भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतवर असतील. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रिषभला कसे रोखायचे याबाबत न्यूझीलंड काय योजना करणार याबद्दल न्यूझीलंडच्या गोलंदाजी प्रशिक्षकांनी आपले मत व्यक्त केले आहे.
असे रोखणार रिषभला
मागील सहा महिन्याच्या कालावधीपासून रिषभ पंत कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये तो भारताचा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून समोर आला होता.
आता, कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याला कसे रोखायचे याबाबत बोलताना न्यूझीलंडची गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स जर्गंसन म्हणाले, “रिषभ एक शानदार खेळाडू आहे. तो एकहाती सामना पालटू शकतो. मागच्या काळातील त्याचा खेळ आपण सर्वांनी पाहिला आहे. तो नेहमी सकारात्मक राहून फलंदाजी करतो. मात्र, त्याच्या याच शैलीचा आम्हाला त्याला बाद करताना फायदा होईल.”
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडकडे टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट व नील वॅग्नर हे अनुभवी वेगवान गोलंदाज आहेत. तर, युवा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन व फिरकीपटू एजाज पटेल त्यांना साथ देतील.
रिषभ आहे अविस्मरणीय फार्ममध्ये
भारतीय संघाने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्याची किमया केली. सिडनी कसोटीत ड्रॉ करण्यात व ब्रिस्बेन कसोटीत विजय मिळवून देण्यात रिषभचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने तुफान फटकेबाजी केली व ४ सामन्यात १ शतक व २ अर्धशतके झळकावली. कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएल २०२१ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत होता. स्पर्धा थांबविण्यात आली तेव्हा दिल्ली गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होती.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० क्रिकेटमध्ये ‘सुपर फ्लॉप’ ठरलेले तीन फलंदाज; दोघांचे आहे मुंबई इंडियन्सशी नाते
विराट अन् रोहितचा फोन आला तर कोणाचा कॉल उचलशील? २३७ विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणतो…