इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यासाठी आली होती. परंतु येत्या १९ सप्टेंबरपासुन युएईमध्ये या स्पर्धेतील उर्वरित सामने खेळले जाणार आहेत. दरम्यान बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायजींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळण्यास नकार दिला होता. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे की, न्यूझीलंड संघातील खेळाडू इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या उर्वरित हंगामासाठी उपलब्ध असणार आहेत. याची घोषणा न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख डेव्हिड व्हाईट यांनी केली आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड संघाला पाकिस्तानचा दौरा करायचा आहे. तरीही डेव्हिड व्हाईट यांनी म्हटले की, “केन विलियमसन, काइल जेमिसन, ट्रेंट बोल्ट आणि इतर खेळाडू आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरित हंगामासाठी उपलब्ध असणार आहेत.” (New zealand cricket players will allow their players to play second phase of ipl 2021,says devid white)
असे म्हटले जात होते की, इंग्लंडनंतर न्यूझीलंड संघातील खेळाडू देखील आयपीएल २०२१ सपर्धेच्या दुसऱ्या हंगामासाठी उपलब्ध राहणार नाहीत. परंतु डेव्हिड व्हाईट यांनी केलेल्या खुलास्यानुसार, न्यूझीलंड संघातील खेळाडू या स्पर्धेसाठी उपलब्ध असणार आहेत.
डेव्हिड व्हाईट यांनी जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन, ट्रेंट बोल्ट, जिमी निशम आणि लॉकी फर्ग्युसन पाकिस्तान संघाविरुद्ध होणारी मालिका सोडून आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.” येत्या १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही मोठी स्पर्धा पाहता बांगलादेश आणि इंग्लंड या दोन्ही बोर्डांनी आपल्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. तसेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड देखील आपल्या खेळाडूंना बाहेर ठेऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रमवीर बाबर आजम! वेस्ट इंडिजविरुद्ध झुंजार अर्धशतक झळकावत विराट-रोहितवरही ठरला वरचढ
‘या’ धुरंधरावर सीएसकेचे लक्ष! तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये अवघ्या ५ सामन्यात चोपल्यात २९६ धावा
Video: कॅम्पमध्ये परतला कर्णधार अय्यर, दिल्ली कॅपिटल्सला चँपियन बनवण्यासाठी लावणार पूर्ण जोर