न्यूझीलंडचे खेळाडू त्यांच्या खिलाडूवृत्ती आणि शांत स्वभावासाठी ओळखले जातात. मैदानावर खेळाडूंची वागणूक कशी असावी यासाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंची अनेकदा उदाहरणे दिली जातात. परंतु न्यूझीलंडच्या एका संकेतस्थळाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीचा अपमान केला आहे. न्यूझीलंडमधील क्रीडा संकेतस्थळ TheAccNZ ने एक वादग्रस्त छायाचित्र पोस्ट केले असून ते पाहिल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.
TheAccNZ संकेतस्थळाने आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक छायाचित्र पोस्ट केले आहे ज्यामध्ये एक स्त्री एका पुरुषाच्या गळ्याला पट्टा लावताना दिसत आहे. या छायाचित्रातील महिलेला कायले जेमिसन असे म्हटले आहे, तर विराट कोहलीचे नाव त्या माणसाच्या समोर लिहिलेले आहे, ज्याच्या गळ्याला पट्टा आहे. हे छायाचित्र एका अत्यंत हिन दर्जाचे भारत असून, ज्यामध्ये विराट कोहलीचा अपमान करण्यात आला आहे.
कायले जेमिसनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील दोन्ही डावांत विराट कोहलीला बाद केल्यानंतर TheAccNZ ने हे छायाचित्र प्रकाशित केले आहे. TheAccNZ हे संकेतस्थळ क्रिकेट आणि इतर खेळांबाबत नेहमी माहिती देत असते. त्यांचे इंस्टाग्रामवर ४५ हजारपेक्षा जास्त फॉलोवर आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावामध्ये जेमिसनने विराटला पायचित पकडले, तर दुसऱ्या डावात विराट पुन्हा जेमिसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे झेल देत बाद झाला. जेमिसनच्या धारदार गोलंदाजीचा न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा होता.
कायले जेमिसनला उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीर पुरस्कार मिळाला. या अष्टपैलू खेळाडूने पहिल्या डावात पाच महत्त्वपूर्ण बळी तसेच, दुसऱ्या डावात दोन बळी मिळवले. जेमिसनच्या या कामगिरीचे विराट कोहलीनेही कौतुक केले. तसेच, न्यूझीलंड संघाचे कसोटी चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.
महत्त्वाच्या बातम्या –
“न्यूझीलंड क्रिकेटमधला हा सुवर्णक्षण, याचे सर्व श्रेय…”, किवी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
“कुलदीपच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला कर्णधार विराटसह वरिष्ठ खेळाडूंच्या सहकार्याची गरज”
धोक्याची घंटा! ‘या’ ४ खेळाडूंचे अपयश भारताला भोवले, संघातील स्थानावरही उभे आहे प्रश्नचिन्ह