---Advertisement---

धोक्याची घंटा! ‘या’ ४ खेळाडूंचे अपयश भारताला भोवले, संघातील स्थानावरही उभे आहे प्रश्नचिन्ह

On: शुक्रवार, जून 25, 2021 12:32 AM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा बुधवारी (२३ जून) अंतिम निकाल लागला. या स्पर्धेचा निकाल २ दिवसाचा खेळ बाद होऊनही उरलेल्या ४ दिवसात लागला. या ४ दिवसात न्यूझीलंड संघाने चांगला खेळ करून भारतीय संघाला दबावात आणले. ज्यामुळेच भारतीय संघाचा पराभव झाला. न्यूझीलंड संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहीला विजेता झाला. आता भारतीय संघाला झालेला पराभव विसरून एका नव्या जोशात येणाऱ्या सामन्याचा सामना करावा लागणार.

येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतीय संघाची इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका आहे. विराट कोहलीने वर्चुअल पत्रकार परिषदे दरम्यान सांगितले की, येत्या इंग्लंड दौऱ्यासाठी काही बदल करावे लागतील. त्यामुळे विराट कोहली येत्या मालिकेसाठी संघात काय बदल करणार याचे सर्व भारतीय क्रिकेट रसिक डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काही खेळाडूंची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. तसेच गेल्या काही महिन्यात त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसून आलेले नाही. त्यामुळे आता अशा खेळाडूंच्या संघातील जागेवर प्रश्न निर्माण होत आहे. असे कोणते ४ खेळाडू आहेत, याचा एक आढावा या लेखातून घेऊ.

चेतेश्वर पुजारा
भारतीय संघाची नवी भिंत म्हणून ओळखला जाणऱ्या पुजाराच्या कामगिरी सातत्य दिसून आलेले नाही. ज्याप्रमाणे पुजारा कसोटी क्रिकेट खेळतो तशी लय आता गेली एक-दोन वर्ष त्याचा फलंदाजीतून दिसलेली नाही. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुजाराने अतिशय खराब प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात पुजाराने पहिल्या डावात ८ तर, दुसऱ्या डावात १५ धावा केल्या. त्यामुळेच आता कोहली पुजाराला पुन्हा संघात स्थान देणार की नाही या बद्दल प्रश्न चिन्ह आहे.

जसप्रीत बुमराह
भारतीय गोलंदाजीचा केंद्रबिंदू बुमराहकडून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याक मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र तो या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही डावातील गोलंदाजी मिळूनसुद्धा तो एकही गडी बाद करू शकला नाही. बुमराहचा गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्म सुरु आहे. त्यामुळे भारताला त्याच्या खराब फॉर्मचा फटका बसू शकतो.

अजिंक्य रहाणे
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू  म्हणजे अजिंक्य रहाणे आहे. रहाणेने १८ कसोटी सामन्यात ३ शतक आणि ६ अर्ध शतक केले. त्याने ४२.९२च्या सरासरीने ११५९ धावा केल्या. परंतु, रहाणेला अंतिम सामन्यात फार काही खास करता आले नाही. त्याने पहिल्या डावात ४९ धावांची खेळी केली होती. पण त्याला त्या खेळीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आले. रहाणेच्या कामगिरीने गेल्या अनेक महिन्यात सातत्येची कमी दिसून आली आहे.

शुबमन गिल
हे निश्चित आहे की, गिलकडे भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. परंतु, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो अपेक्षेप्रमाणे फलंदाजीत काही खास करू शकला नाही. सामन्यापूर्वीच गिलला घेतल्यामुळे क्रिकेट रसिकांमध्ये चर्चा रंगली होती की, गिलच्या ऐवजी मयंक अगरवालला संधी दिली पाहिजे होती. म्हणूनच येत्या इंग्लंड विरुद्ध मालिकेत गिलला त्याचा फलंदाजीत प्रदर्शन करता आले नाही तर, गिलला संघातून जागा गमवावी लागू शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

कर्णधार कोहलीचा पंतला पूर्ण पाठिंबा; म्हणाला, ‘त्याने असेच खेळत राहावे, हीच आमची इच्छा’

WTC फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर विराटने सांगितले, ‘या’ गोष्टींकडे द्यावे लागेल टीम इंडियाला लक्ष

पत्नीच्या संगतीत राहून युझवेंद्र चहलही बनलाय ‘डान्समास्टर’, बॉलिवूडच्या गाण्यांवर झक्कास नाचलाय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---