एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून (१८ जून) हा सामना सुरू होणार आहे. मात्र, सध्या एजबॅस्टनमध्ये पाऊस असल्याने सामना उशिरा सुरू होईल. वेधशाळेने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरला असून, चाहते व खेळाडू सामना सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु हा रिकामा वेळ भरून काढण्यासाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी वेगळीच शक्कल लावली.
पावसामुळे सुरू होऊ शकला नाही सामना
प्रथमच आयोजित होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा बहुप्रतिक्षित अंतिम सामना नियोजित १८ जून रोजी ठरलेल्या वेळी सुरू होऊ शकला नाही. एजबॅस्टन येथे १७ जूनच्या रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर, पुन्हा दुसऱ्या दिवशी देखील पावसाने चांगलाच जोर धरला. इंग्लिश प्रमाणवेळेनुसार सामना सकाळी १० वाजता सुरू होणार होता. मात्र, निर्धारित वेळेच्या एक तास आधी आयोजकांनी पहिल्या सत्राचा खेळ रद्द केल्याचे जाहीर केले.
न्यूझीलंडच्या खेळाडूंनी असा घालविला वेळ
सामना निर्धारित वेळेत सुरू न झाल्याने इंग्लंडचे खेळाडू मैदानावर आले नाहीत. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानाचा भाग असलेल्या हिल्टन हॉटेल येथे सर्व खेळाडू राहत आहेत. मैदानावर पाऊस पडत असताना हे सर्व खेळाडू एकत्रितरीत्या सामना सुरु होण्याची वाट पाहताना दिसले. त्यांनी हा फावला वेळ पुस्तके वाचण्यात घालवण्याचे दिसून आले.
Rain to start in Southampton means coffee and a chat watching the covers to start the day. #WTC21 pic.twitter.com/dLhbAd5C4l
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 18, 2021
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केलेल्या ट्विटमध्ये संघाचे वेगवान गोलंदाज टिम साऊदी, मॅट हेन्री व कायले जेमिसन चर्चा करताना दिसून येतायेत. तसेच, त्यांच्यासमोर काही पुस्तके देखील आहेत. या छायाचित्राला कॅप्शन देताना लिहिले गेले आहे की,
‘साउथम्पटनमध्ये पावसाला सुरुवात म्हणजेच कॉफी आणि गप्पांच्या आस्वादात कव्हर्स हटवण्याची वाट पाहताना.’ पावसामुळे नाणेफेक देखील पुढे ढकलण्यात आली आहे.
भारतीय संघाने जाहीर केला आहे संघ
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताने एक दिवस आधीच संघनिवड जाहीर केली आहे. भारतीय संघाने वेगवान गोलंदाजांना मदत करणार्या खेळपट्टीवर रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा या क्रिकेटपटूंना संधी दिली. न्यूझीलंड संघाने मात्र अद्याप आपला संघ घोषित केला नाही.
महत्वाच्या बातम्या-
WTC Final: पावसामुळे चिंतेचे कारण नाही, आयसीसीची ‘ही’ तरतुद भरून काढणार वाया गेलेला वेळ
भारतीय महिलांची आश्चर्यकारक घसरगुंडी, १६७ धावांच्या सलामीनंतर २३१ वर आटोपला डाव
WTC Final: एमएस धोनीला ‘या’ विक्रमात मागे टाकत विराट कोहली पटकवणार अव्वल स्थान